Baba Vanga saam tv
लाईफस्टाईल

Baba Vanga: पहलगाम घटनेची बाबा वेंगानी केलेली भविष्यवाणी; पाहा काय दिले होते संकेत

Baba Vanga Prediction: बल्गेरियातील बाबा वेंगा हे त्यांच्या भविष्यवाणींसाठी फार लोकप्रिय आहेत. मंगळवारी काश्मिरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर बाबा वेंगा पुन्हा एकदा चर्चेत आळे आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

काश्मिरमधील पहलगामध्ये झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देश पेटून उठला आहे. या हल्ल्यानंतर भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण दिसून येतंय. अशातच पुन्हा एकदा बाबा वेंगा याचं नाव चर्चेत आलं आहे. बाबा वेंगा यांनी जगाच्या सर्वनाशाबाबत भविष्यवाणी केली होती. दरम्यान काही लोकांच्या म्हणण्यानुसार, बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी होताना दिसतेय.

असं म्हटलं जातंय की, बाबा वेंगा यांनी पहलगामवर झालेल्या हल्ल्याची भविष्यवाणी केली होती. या हल्ल्याला बाबा वेंगांच्या २०२४३ पर्यंतच्या जगामध्ये इस्मामच्या शासनाशी जोडलं जातंय. इतकंच नाही तर बाबा वेंगांनी २०२५ पासून जगाच्या विनाशाला सुरुवात होईल अशी गंभीर भाकितही केली होती, ज्यामुळे जगातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

बाबा वांगा हे एक अंध बल्गेरियन नागरिक होते. त्यांनी केलेल्या भविष्यवाण्यांसाठी ते प्रसिद्ध होते. १९९६ मध्ये त्यांचं निधन झालं. अशा परिस्थितीत, बाबा वांगांनी जगाच्या विनाशाबद्दल कोणती भाकितं केली होती ती पाहूयात.

२०२५ मध्ये युरोपमध्ये संघर्ष होण्याची शक्यता

बाबा वांगा यांनी २०२५ मध्ये युरोपमध्ये एक मोठा संघर्ष सुरू होणार असल्याची भविष्यवाणी केली होती. यामध्ये त्यांनी असंही म्हटलं होतं की, जगाचा विनाश या संघर्षापासून सुरू होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर जगात व्यापार युद्ध सुरू झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आतापर्यंत अमेरिकेसारख्या देशाच्या बाजूने उभे राहिलेले अनेक युरोपीय देशही ट्रम्पच्या धोरणांना विरोध करू लागलेत. जर हा संघर्ष असाच सुरू राहिला तर प्रकरण गंभीर होऊ शकते आणि युरोपमधील परिस्थिती अराजक बनू शकते.

२०४३ पर्यंत येणार इस्लामिक शासन

याव्यतिरीक्त बाबा वेंगा यांनी अजून एक भविष्यवाणी केली होती. यामध्ये बाबा वेंगा यांनी २०४३ पर्यंत जगात इस्लामिक राजवट येण्याबद्दल सांगितलंय. अशातच बरेच लोक पहलगाम हल्ल्याचा संबंध या हल्ल्याशी जोडतायत. लोकांच्या म्हणण्यानुसार, बाबा वेंगांची ही भाकीतं पाकिस्तानच्या संदर्भात होती.

पहलगाम हल्ल्यानंतर आशियामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं दिसून येतंय. जिथे भारत आणि पाकिस्तानसारख्या देशांच्या सीमेवर लष्करी संघर्ष सुरू होण्याची भीती आहे. जर हा संघर्ष वाढला तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे आता बाबा वेंगा यांची ही भविष्यवाणी खरी ठरत असल्याचा धोका आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

Shriya Pilgaonkar: 'आम्हाला तुझा विशेष अभिमान...' सचिन पिळगावकरची लेकीसाठी खास पोस्ट

Akshay Kumar : मुंबईतील दोन घरं विकली; अक्षय कुमार झाला मालामाल, नफा वाचून बसेल धक्का

Pune Rave Party: ड्रग्ज घेतलं नाहीत, गुन्हा नाही, मग जावई पहिल्या क्रमांकाचा आरोपी कसा? खडसे पोलिसांवर संतापले

SCROLL FOR NEXT