Ayurvedic Tips Saam Tv
लाईफस्टाईल

Ayurvedic Tips : बहुगुणी आहे 'ही' वनस्पती, त्वचेच्या समस्यांवर तर रामबाण उपाय !

हे फूल आकाराने छोटे आणि वाटीसारखे असते. त्याच्या आत लाल, वांगी रंगाचे ठिपके असतात.

कोमल दामुद्रे

Ayurvedic Tips : आयुर्वेदात अशा अनेक औषधी वनस्पती आहेत ज्यांच्या आपल्याला आरोग्यासाठी अधिक फायदा होतो. हे फूल जितके शंकराला प्रिय आहे तितकेच ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर (Benefits) आहे.

रुई ही एक विषारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती (झुडुप) आहे. या झुडपाचे पान तोडल्यानंतर त्यातून दुधासारखा चिकट पातळ पदार्थ (चीक) निघतो. या झाडांच्या फुलांचे गुच्छ मनमोहक दिसतात. यामुळे भुंगे, कीटक व फुलपाखरे यांचा सतत वावर याच्याजवळ असतो.

रुई मंदाराचे फूल आकाराने छोटे आणि वाटीसारखे असते. त्याच्या आत लाल, वांगी रंगाचे ठिपके असतात. हे झाड शरीराच्या अनेक आजारांवर (Disease) उपयोगी आहे. जाणून घेऊया या फूलाचा कसा फायदा आपल्याला होईल.

१. डोकेदुखी व कानदुखी -

रुई मंदाराच्या फुलाचा उपयोग हा डोकेदुखी व कानदुखीच्या समस्येवर रामबाण उपाय आहे. याचे चिक कपाळावर लावल्यास अर्धशिशीच्या दुखण्यात फायदा होतो. तसेच याचा रस कानात टाकल्याने कानाशी संबंधित आजारांवर मात करता येते.

२. डोळ्यांच्या आजारासाठी फायदेशीर -

रुई मंदाराच्या फुलासोबत त्याचा सालीचा ही आपल्या आरोग्यासाठी फायदा होतो. रुई मंदारच्या सालीनेयुक्त हे पाणी डोळ्यांसाठी खूप उपयोगी आहे. याने डोळे लाल होणे, जड होणे, दुखणे किंवा डोळे चूरचूरणे सारख्या समस्या दूर होतात.

३. दातदुखीवर उपायकारक -

रुई मंदारच्या चिकात कापूस भिजवून तो तुपात बुडवायचा दातावर लावल्यास दातदुखी दूर होते. याशिवाय याचा अर्क दुधात मिसळून दातावर लावल्यासही दातांचे दुखणे थांबते.

४. त्वचेसाठी फायदेशीर -

रुई मंदारच्या चिकामध्ये हळद व गुलाब पाणी एकत्र करून हा लेप चेहऱ्यावर लावल्यास फायदा होतो. या लेपाने त्वचा मुलायम होते. ज्यांची त्वचा आधीपासूनच मुलायम आहे त्यांनी चेहऱ्यावर उजळपणा येण्यासाठी रुईच्या चिकाऐवजी अर्क वापरावा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'याच्यामुळे माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला', शिंदेसेनेच्या नेत्याचा बॅनर फाडत मुलीचा गंभीर आरोप; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : माजी खासदार संजय काका पाटील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी वेगळ्या भूमिकेत

Thursday Horoscope: स्वतःवर गर्व वाटेल अशा गोष्टी घडतील; या ५ राशींसाठी आजचा दिवस खास

Hair Care: ६ आठवड्यात थांबेल कायमचे केस गळणे, करा हा साधा घरगुती उपाय; केस होतील घनदाट आणि शायनी

Maharashtra Politics : अजित पवारांना मोठा धक्का; अहिल्यानगरमधील शिलेदार कार्यकर्त्यांसह ओवेसींना साथ देणार

SCROLL FOR NEXT