Ayurvedic Plant For Diabetes Saam Tv
लाईफस्टाईल

Ayurvedic Plant For Diabetes : ही पाने मधुमेहांसाठी ठरतील फायदेशीर, साखरेची पातळी देखील नियंत्रणात ठेवेल !

मधुमेहाला निणयंत्रणात ठेवण्यासाठी या पानांविषयी जाणून घ्या

कोमल दामुद्रे

Ayurvedic Plant For Diabetes : मधुमेह असणाऱ्या रुग्णांना खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. आहारातील चुकीच्या सवयींमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढली जाते.

यामुळे आपल्या घरात मधुमेह असणारे रुग्ण घरात असले की, आपल्याला सतत चिंता वाटू लागते. आम्ही तुम्हाला सांगतो की मधुमेहामध्ये इन्सुलिनची कमतरता असते. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी वाढते.

इन्सुलिनच्या वनस्पतीची पाने चघळल्याने शरीरातील साखरेची पातळी कायम राहते. चला तर मग जाणून घेऊया त्याच्याबद्दल.

इन्सुलिन वनस्पतीच्या पानांचे फायदे-

१. इन्सुलिन वनस्पतीमध्ये कॉसॉलिक ऍसिड आढळते. जे खोकला, सर्दी, संसर्गजन्य आजार, फुफ्फुस आणि दमा यांसारख्या आजारांवर फायदेशीर ठरते. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनानी ६ ते ७ वेळा थोडे अंतर ठेवून अन्न खाल्ल्यास शरीरात इन्सुलिन पुन्हा निर्माण होते. त्यासाठी मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी अंतर राखून खाल्ल्यास फायदा होईल.

२. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, इन्सुलिन प्लांटची पाने एक महिना रोज चघळल्याने शरीरातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. आपण याचे सेवन चुरणच्या स्वरूपातही करू शकतो. याची कोरडी पाने बारीक करून पावडर बनवून खायची आहे. यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो.

३. या वनस्पतीमध्ये प्रथिने, टेरपेनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स, अँटिऑक्सिडंट्स, ऍस्कॉर्बिक ऍसिड, लोह, बी-कॅरोटीन, कोरोसोलिक ऍसिडसह अनेक पोषक घटक आढळतात. ज्यामुळे मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांना याचा फायदा होतो.

४. कडधान्य, ओट्स, बेसन, भरड तृणधान्ये, टोन्ड मिल्क आणि दह्यांसह, मटार, शेंगा, कोबी, भेंडी यांसारख्या फायबर भाज्या, पालक, सोललेली कडधान्ये, ओमेगा ३ फॅटी ऍसिडिक तेल, पपई, सफरचंद, इतर हिरव्या पालेभाज्या, फळांमध्ये (Fruit) संत्री आणि पेरू यांसारख्या पदार्थाचा आहारात समावेश केल्यास अधिक फायदा होतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळेंचं मंत्री संजय सावकारे यांचा कार्यालयाच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन

Akola Politics: भाजपची डोकेदुखी वाढली, अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली, नेमकं काय घडलं?

Pune Accident: नवले पुलावरून जाताना ब्रेक फेल, कंटेनर अनेक वाहनांना उडवत गेला; मृतांचा आकडा वाढण्याची भीती, थरकाप उडवणारा VIDEO

kalakand Recipe: संध्याकाळी गोड खायला आवडतं? मग, आज घरी नक्की बनवा हॉटेल स्टाईल कलाकंद, वाचा सोपी रेसिपी

Pune Navale Bridge Accident: काचांचा ढीग, वाहनं पेटली, ५ जणांचा जागीच मृत्यू पुण्यातील नवले पुलावर भीषण अपघात | VIDEO

SCROLL FOR NEXT