Sketch Artist Jay Patil विजय पाटील
लाईफस्टाईल

Beautiful Sketches: दहावीच्या विद्यार्थ्याने साकारले अप्रतिम स्केचेस; अभ्यासासह जोपासली कला...

Beautiful Sketch Artist: शाळेत कला (Arts) विषयाचे स्पेशल विषय शिक्षक नसतानाही त्याने स्वतःच कला आत्मसात केली आहे.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली: दोन वर्षांपासून सर्वत्र कोरोनाचे (Corona) संकट घोंघावत असल्याने सतत लॉकडाऊन यामुळे मुलांची शाळा, मैदानावरील खेळणे बंद झाले असून ऑनलाईन शिक्षण (Online Study) सुरू आहे. दहावी, बारावी या महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षांच्या परीक्षांचे टेन्शन विद्यार्थ्यांना असते. करमणुकीसाठी घरी टिव्ही आणि मोबाईल यांचा अतिरेक वापर यामुळे अनेक मुलं एकलकोंडी बनली आहेत. तर काहींचा चिडचिडेपणा वाढला आहे. (Awesome sketches drawn by school student jay patil in sangli)

हे देखील पहा -

अशावेळी सांगलीच्या (Sangli) शिराळा (Shirala) तालुक्यातील फुपेरे (Fupere) गावच्या जय चंद्रकांत पाटील (Sketch Artist Jay Patil) या दहावीच्या विद्यार्थ्याने मात्र अभ्यासासोबत आपल्या अंगी असलेली कलागुणाची छानपणे जोपासना केली आहे. शाळेत कला (Arts) विषयाचे स्पेशल विषय शिक्षक नसतानाही त्याने स्वतःच कला आत्मसात केली आहे. त्याला खासकरून व्यक्तीचित्रात रुची असून त्याने पेन्सिल या माध्यमातून अनेक अप्रतिम अशी व्यक्तीचित्रे साकारली आहेत.

जयने रेखाटलेली व्यक्तीचित्रे
जय पाटील स्केच रेखाटताना

त्याने काढलेल्या मुलीच्या चित्रातील तिने घातलेल्या जीन्सच्या जॅकेटचा जाडजूडपणा, आणि शिलाई अप्रतिम रेखाटली आहे. जयने व्यक्तीचित्रातील हुबेहूबपणा अत्यंत बारकाईने टिपल्याचे त्याच्या चित्रातून दिसून येते. त्याला पुढे कलाक्षेत्रात करिअर करायचे असून यासाठी त्याचे आईवडील, आजोबा, मामा यांचे चांगले सहकार्य लाभत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महात्मा फुले रुग्णालयच्या पुनर्निर्माणवरून श्रेयवाद रंगला

Mobile Recharge: कमी बजेट? तरीही मिळणार 5G इंटरनेट, Vi चा 'हा' प्लॅन तुमच्यासाठी आहे परफेक्ट

Actress Oops Moment: 'द फॅमिली मॅन ३' फेम अभिनेत्रीचा इव्हेंटमध्ये तोल गेला; पायऱ्यांवरून उतरताना पडली अन्..., VIDEO व्हायरल

Shocking: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, मध्यरात्री झोपेत असताना जागीच संपवलं

Shocking : चाकूने सपासप वार करत बायकोला संपवलं, नंतर स्वत:ही उचललं टोकाचं पाऊल; कल्याण हादरलं!

SCROLL FOR NEXT