Christmas gift ideas google
लाईफस्टाईल

Christmas gift ideas : प्रियजनांना ख्रिसमस गिफ्ट देण्याचा विचार करताय? कधीच देऊ नका 'ही' वस्तू, होतील गंभीर आजार

Safe gift ideas : आता ख्रिसमस सण काही दिवसांवर आला आहे. त्यात भेटवस्तूमध्ये आपण रोजच्या वापरातली एखादी वस्तू देण्याचं ठरवतो. पण त्यातली एक भेटवस्तू आपल्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या जीवावर बेतू शकते.

Saam Tv

सध्या ख्रिसमस सण काही दिवसांवर आला आहे. या सण दरवर्षी २५ डिसेंबरला साजरा केला जातो. जगभरात हा सण खूप मोठ्या संख्येने साजरा केला जातो. या दिवशी सगळे एकमेकांना भेटवस्तू देतात. आता भेटवस्तूमध्ये आपण रोजच्या वापरातली एखादी वस्तू देण्याचं ठरवतो. त्यात कपडे, शुज, घड्याळ, डायरी, पेन, चैन, अंगठी अशा वस्तू देतो. मग यात आपण आलेले ट्रेंड्स बघतो आणि ते गिफ्ट एकमेकांना देतो. पण त्यातली एक भेटवस्तू आपल्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या जीवावर बेतू शकते.

नुकतचं एका संशोधनात समोर आलय की, स्मार्ट वॉचच्या पट्ट्यांमध्ये जीवघेणे केमिकल्स असू शकतात. त्याने कॅन्सर, वंधत्व असे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. अमेरिकेच्या नोट्रे डेम युनिवर्सिटीच्या संशोधकांनी २२ स्मार्ट वॉच ब्रॅंड्सचा अभ्यास केला. यापैकी १५ ब्रॅंडमध्ये परफ्लूरोआल्किल आणि पॉलीफ्लूरोआल्किल सब्सटेंसेज या नावाची रसायने आढळून आली आहे.

परफ्लूरोआल्किल आणि पॉलीफ्लूरोआल्किल सब्सटेंसेज या कॅमीकल्सला 'फॉरेवर कॅमिकल्स' सुद्धा म्हटलं जातं. याचा वापर घड्याळ्याच्या पट्यांना मजबूत करण्यासाठी आणि ते जास्त काळ टिकण्यासाठी तयार केले जाते. त्याने कॅन्सर, थायरॉइड, हार्मोनल असंतुलन, वंध्यत्व आणि शरीरातील न्यूरोलॉजिकल विकार यांसारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो.

संशोधकांच्या मते, जास्त काळ स्मार्ट वॉच वापरणाऱ्या व्यक्तींच्या शरीरात ही कॅमिकल्स असतात. ती त्वचेच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करतात. यासाठी स्मार्ट वॉच खरेदी करताना त्यात फ्लूरोइलास्टोमर्स नसेल याची खात्री करणे आवश्यक आहे. शक्यतो तुम्ही सिलिकॉन किंवा प्लास्टिकच्या घड्याळ्यांचा वापर न करता. तुम्ही लेदरच्या घड्याळाचा वापर करू शकता. तसेच गरज नसताना तुम्ही स्मार्ट वॉटचा वापर करणे टाळा.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Written By : Sakshi Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यापुढे बोलताना काळजी घेईल, कोकाटेंचे स्पष्टीकरण

Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

Walnut Benefits: दररोज ३ ते ४ अक्रोड खाल्ल्याने दूर होते आरोग्याची 'ही' त्रासदायक समस्या

Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

SCROLL FOR NEXT