Winter Child Health saam tv
लाईफस्टाईल

Winter Health: थंडीच्या दिवसांत लहान बाळांची काळजी घेताना 'या' चुका टाळा; डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Winter Child Health: हिवाळ्यात हवामानात तसंच तापमानात लक्षणीय बदल होतो आणि विशेषत: लहान मुलांसाठी विविध आरोग्य समस्यांचा धोका वाढतो.

Surabhi Jayashree Jagdish

थंड हवामान हे आपल्या घरातील लहान मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करू शकते. त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात हवामानात तसंच तापमानात लक्षणीय बदल होतो आणि विशेषत: लहान मुलांसाठी विविध आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. ते सर्दी, फ्लू, श्वसन संक्रमण, कोरडी त्वचा, खोकला, कानाचा संसर्ग, हायपोथर्मिया, ओठ फाटणे, त्वचेस भेगा पडणे आणि अगदी फ्रॉस्टबाइट यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांना बळी पडतात. या समस्यांमध्ये विविध घटक योगदान देतात.

पुण्यातील मदरहुड हॉस्पिटलमधील बालरोग आणि नवजात शिशु तज्ञ डॉ अतुल पालवे म्हणाले, यामध्ये शरीराचा लहान आकार, हळूहळू विकसित होणारी रोगप्रतिकारक शक्ती आणि तापमानात अचानक होणाऱ्या बदलांची वाढलेली संवेदनशीलता यासारख्या घटकांचा समावेश असू शकतो. पालकांना सल्ला दिला जातो की, त्यांनी त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी त्यांच्या बाळांची अत्यंत काळजी घेणं गरजेचं आहे. वेळीच आरोग्यविषयक समस्या ओळखणं आणि त्यांचे निराकरण करणं हे मुलांना थंडीच्या दिवसातही सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यास मदत करते. हिवाळ्यात आपल्या बाळाची अतिरिक्त काळजी घेण्यासाठी पालकांसाठी याठिकाणी काही टिप्स दिल्या आहेत.

हिवाळ्यात बाळाची काळजी घेण्यासाठी खास टिप्स

बाळाला उबदार ठेवा

हिवाळ्यात तुमचं बाळ उबदार राहील याची खात्री करा. त्यांच्या शरीराचं तापमान योग्य राखण्यासाठी त्यांना योग्य उब मिळावी यासाठी लोकरीसारख्या कपड्यांचा वापर करा. बाळाला उबदार ठेवण्यासाठी मऊ आणि श्वास घेण्यायोग्य लोकरीचे स्वेटर, हातमोजे आणि टोपी वापरा. तुमच्या बाळाच्या मानेला किंवा पाठीला स्पर्श करून तुम्ही तुमच्या बाळाला पुरेशी ऊब मिळते आहेत की नाही याची खात्री करु शकता.

बाळाच्या त्वचेचं संरक्षण करा

हिवाळ्यात बाळाची त्वचा खूप कोरडी होऊ शकते. त्यांची त्वचा हायड्रेटेड आणि मऊ ठेवण्यासाठी त्यांच्या त्वचेवर मॉइश्चरायझरचा वापर करा. केमिकल आणि सुगंधविरहित तसंच लहान मुलांच्या नाजूक त्वचेसाठी तयार केलेले मॉइश्चरायझर्स वापरा. त्यांना गरम पाण्याने आंघोळ धालणं टाळा कारण ते त्यांच्या त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकते व त्यांच्या त्वचेवर वाईट परिणाम करू शकते.

श्वासोच्छवासाकडे लक्ष द्या

हिवाळ्यात, लहान मुलांना खोकला आणि नाक चोंदणं यांसारख्या श्वासोच्छवासाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावं लागतं. बाळ जास्त वेळ थंड हवेच्या संपर्कात येणार नाही याची खात्री करा. कारण यामुळे विविध आरोग्य समस्या वाढू शकतात. जर तुमच्या बाळाला सतत शिंका येत असेल, खोकला येत असेल किंवा श्वास घेण्यात सतत त्रास होत असेल, तर पुढील निदानासाठी त्यांना ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जा.

बाळाला मालीश करा

बाळाच्या नाजूक त्वचेवर तेलाने नियमितपणे मालिश करा. याकरिता तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तेल वापरा. त्यांच्या शरीराला तेलाने हलक्या हाताने मसाज केल्याने त्यांच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते आणि त्यांची त्वचा मॉइश्चराइजही होते. हे त्यांना आराम करण्यास आणि रात्री शांत झोपण्यास मदत करते. मसाज करताना तुम्ही जास्त दाब वापरत नसल्याची खात्री करा.

बाळाला जास्त ऊबदार ठेवणं टाळा

असं केल्याने बाळाला अस्वस्थ वाटू शकतं. अतिउष्णतेमुळे लहान मुलांमध्ये सडन इन्फंट डेथ सिंड्रोम (SIDS) होण्याचा धोका वाढू शकतो, ज्यामुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. त्यांना नेहमी घराबाहेर पडताना किंवा घरात तापमानानुसार कपडे घाला. बाळ झोपलेलं असताना त्यांच्यावर जड ब्लँकेट घालणं टाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kite Making Ideas: मुलांच्या प्रोजेक्टसाठी पतंग बनवायचाय? या टीप्स फॉलो करा, ५ मिनिटांत झटपट होईल तयार

HSC Board Exam : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आजपासून मिळणार ऑनलाईन हॉल तिकीट; कसं कराल डाउनलोड ? वाचा

Ukadiche Modak Recipe : सारण भरल्यावर उकडीचे मोदक फुटतात? मग 'ही' रेसिपी एकदा फॉलो कराच

Bigg Boss Marathi 6 : पहिल्याच दिवशी सदस्यांची झोप उडाली; बिग बॉसच्या घराचं दार बंद, कोणता टास्क रंगणार?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना 'या' दिवशी मिळणार ₹३०००; सरकारने उचललं मोठं पाऊल

SCROLL FOR NEXT