आजकाल स्वतःला फिट ठेवण्यासाठी अनेकजण जिमसोबतच योगासने करण्यास प्राधान्य देतात. योगामुळे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यही सुधारते. सुडौल शरीर आणि तणावमुक्त जीवन हवे असेल तर जीवनशैलीत योगाचा समावेश आवश्यक आहे. मात्र योग करताना काही चुका शरीरावर दुष्परिणाम करू शकतात. त्यामुळेच आम्ही तुम्हाला योगाचे ५ महत्त्वाचे नियम सांगणार आहोत, जे योग्य परिणामांसाठी आवर्जून पाळले पाहिजेत.
योगा करताना शांतता आणि ताज्या हवेमुळे अधिक फायदे मिळतात. त्यामुळे योगासने नेहमी मोकळ्या आणि हवेशीर जागेत करावीत. बंद आणि गोंगाटाच्या ठिकाणी योगा केल्यास मन एकाग्र होत नाही आणि अपेक्षित परिणाम साधता येत नाहीत. त्यामुळे योग्य वातावरणात योगा करणे आवश्यक आहे.
योगा करण्यासाठी पोट रिकामं असणं आवश्यक आहे. जेवणानंतर लगेच योगा केल्यास पचनसंस्थेवर ताण येतो आणि अपचनासारख्या समस्या होऊ शकतात. विशेषतः रात्री योगा करायचा असल्यास, जेवणानंतर किमान ३ ते ४ तासांचे अंतर ठेवणे हितावह ठरते.
योगा करताना योग्य मार्गदर्शन मिळणं अत्यंत आवश्यक आहे. तज्ज्ञांचा सल्ला न घेता योगाभ्यास केल्यास चुकीच्या आसनांमुळे शरीरात वेदना, स्नायूंवर ताण किंवा इतर आरोग्यविषयक त्रास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीला प्रशिक्षकांकडून योग्य पद्धतीने योगा शिकणं आवश्यक आहे.
योगा करताना जर एखादं आसन कठीण वाटत असेल, तर ते करण्यासाठी घाई करू नका. शरीराच्या क्षमतेप्रमाणे हळूहळू सराव करा. जबरदस्ती केल्यास स्नायूंना इजा होऊ शकते किंवा इतर आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. संयमाने आणि सातत्याने सराव केल्यास आसन सहज साधता येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.