Monsoon food tips, avoid these food eating in monsoon  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

Monsoon care tips : पावसाळ्यात खाण्यापिण्याच्या या चुका टाळा, अन्यथा होऊ शकतो पचनसंस्थेवर परिणाम

पावसाळा आला की, आपल्याला अनेक पदार्थ खाण्याची इच्छा होत असते.

कोमल दामुद्रे

मुंबई : पावसाळा आला की, आपल्याला अनेक पदार्थ खाण्याची इच्छा होत असते परंतु, समतोल आहार व हंगामी पदार्थ खाल्ल्याने आपले आरोग्य अधिक सुदृढ राहाते.

हे देखील पहा -

ऋतूमानानुसार हवामानात बदल होत असतात. आपण थंड-गरम पदार्थ खाल्ल्याने त्याचा आपल्या आरोग्यवर परिणाम होऊ लागतो. पावसाळ्याच्या महिन्यात बऱ्याच रानभाज्या आणि फळे आपल्याला दिसतात. पावसाळ्यात आपल्या अनेक साथीचे रोग देखील जडतात व आपण आजारी पडण्याची संधी वाढत जाते. पावसाळा हा संसर्गाचा काळ मानला जातो त्यामुळे अशावेळी कोणते पदार्थ खायला हवे व कोणते टाळायला हे जाणून घेऊया.

१. पाऊस आला की, आपल्या तळलेले व भाजलेले पदार्थ अधिक खाण्याची इच्छा होऊ लागते. खरेतर पावसाळ्यात आपण तळलेले व भाजलेले पदार्थ खाणे टाळावे. आपण अशावेळी खाण्याचे प्रमाण तपासायला हवे. अतिप्रमाणात तळलेले व भाजलेले पदार्थ खाल्ल्यास आपल्याला पोटदुखी किंवा अतिसारासारखे आजार होऊ शकतात.

२. आपण जर पावसाळ्यात हिरव्या पाल्याभाज्याचे सेवन करत असू तर त्यांना स्वच्छ करणे देखील अधिक महत्त्वाचे आहे. तसेच त्या जास्त प्रमाणात शिजवून त्याचे सेवन करा.

३. पावसाळ्यात (Monsoon) आपल्याला सीफूड खाण्याची अधिक इच्छा होते परंतु, पावसाळा हा ऋतू असा आहे की, यावेळी मासे व इतर सीफूडची प्रजननाची अवस्था असते त्यामुळे सीफूडचे सेवन टाळायला हवे. पावसाळ्यात सीफूडचे सेवन केल्यास आपल्या अतिसार किंवा अन्नातून विषबाधा होण्याचा धोका अधिक असतो.

४. पावसाळ्यात घराबाहेरचे, उकीरड्यावरचे खाणे टाळावे. तसेच जंक फूडचे (Food) देखील खाणे टाळावे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: भयंकर! बलात्कारप्रकरणी १४ वर्षे तरूंगावासाची शिक्षा, बाहेर आल्यानंतर दत्तक घेतलेल्या मुलीवर केला रेप

Voter List Update: राज्यात 10 महिन्यात १४ लाख नवीन मतदारांची भर|VIDEO

Maharashtra Politics: नाशिकच्या पालकमंत्रिपदावरुन कुंभ,भुजबळांची पालकमंत्रिपदासाठी फिल्डिंग

Lion Video Viral: महाराष्ट्रातील पुरात अडकला सिंह? जीव वाचवण्यासाठी सिंहाची धडपड

POCSO : अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, पोक्सो न्यायालयाने महिलेला सुनावली २० वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT