Atal Pension Yojana Saam Tv
लाईफस्टाईल

Atal Pension Yojana : खुशखबर ! सरकारकडून मिळणार प्रत्येक महिन्याला 5000 रुपये, कसे ते जाणून घ्या

APY Scheme : या योजनेअंतर्गत तुम्हालाही ५००० रुपये मिळू शकतात.

कोमल दामुद्रे

Government Scheme : हल्ली बऱ्यापैकी तरुण कामाला जातात. वाढत्या वयानंतर निवृत्तीनंतर पुढे काय हा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो. सरकारच्या अशा काही योजना आहेत ज्याबद्दल आपल्यापैकी अनेकांना पडतो. अशीच एक योजना जी निवृत्तीनंतर देखील आपल्याला सुखी जीवन देऊ शकते.

सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळण्याचे स्वप्न पाहाणाऱ्यांसाठी २०१५ पासून अटल पेंशन योजना राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हालाही ५००० रुपये मिळू शकतात.

कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या सामाजिक-आर्थिक गोष्टींची काळजी (Care) घेत असताना केंद्र सरकारची अटल पेंन्शन योजना चालू आहे. या योजनेअंतर्गत एका निश्चित वयानंतर महिना ५००० रुपये (Money) मिळू शकतात.

या योजनेची माहिती लोकांपर्यंत झपाट्याने पोहोचताना दिसत आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार मार्च २०२३ पर्यंत नॅशनल पेंशन योजना, एनपीएस लाइट, अटल पेंशन योजना या योजनेतील सदस्यांची संख्या ६२४.८१ लाख झाली आहे.

1. वयाच्या ६० वर्षांनंतर प्रत्येक महिना मिळणार पेन्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ पासून सुरुवात या योजनेची झाली आहे. या योजनेच ध्येय आहे की, सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना एकत्र करुन ६० वयानंतर महिना ५००० रुपयांची मदत करण्यात यावी.

2. प्रत्येक महिना फक्त करावी लागणार ४२ रुपयांची गुंतवणूक

अटल पेंशन योजनेची रक्कम घेताना कमीत कमी ४२ रुपये तर जास्तीत जास्त १४५४ रुपयांची गुंतवणूक वयाच्या ६० वर्षापर्यंत करावी लागेल. जर तुम्ही ४२ रुपयांची गुंतवणूक करत असाल तर ६० व्या वर्षी १००० रुपये प्रतिमहिना मिळेल आणि जर १,४५४ रुपये भरत असाल तर महिना ५००० रुपये मिळतील.

3. अटल पेंशन योजनेसाठी कसे उघडाल खाते

  • योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कर्मचाऱ्यांचे वय १८ ते ४० वर्ष असायला हवे.

  • या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेत (Bank) किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते खोलू शकतात

  • प्रत्येक महिना तुम्हाला हवी असलेली रक्कम भरण्यास सुरवात करु शकतात. यानंतर ६० वर्षानंतर तुम्हाला ही रक्काम १००० ते ५००० ह्या आधारे मिळेल.

4. ही योजना खूप लोकप्रिय का आहे?

  • अटल पेंशन योजना ही दिवसेंदिवस लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

  • २०२१-२२ च्या तुलनेत २०२२-२३ वर्षात २० टक्के जास्त लोकांनी या योजनेत नाव गुंतवले आहे.

  • आतापर्यंत ८.९२ टक्के लोकांनी या योजनेत पैसे गुंतवण्यास सुरुवात केली आहे आणि २८,४३४ कोटींपेक्षाही जास्त गुंतवणूक झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT