Parenting Tips Saam TV
लाईफस्टाईल

Parenting Tips : प्रत्येक पालकांसाठी महत्वाचे! मुली शाळेतून घरी आल्याबरोबर विचारा हे प्रश्न

Questions to ask your daughter : प्रत्येक पालकांनी आपल्या लहान मुलींना शाळेत पाठवताना विशेष खबरदारी घेतली पाहिजे. त्यासह मुली शाळेतून घरी आल्यावर दररोज त्यांना काही महत्वाचे प्रश्न विचारलेच पाहिजेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बदलापूमधील नामांकीत शाळेत झालेल्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. मुलींवर अत्याचार झाल्याने शाळेत सुद्धा आपल्या मुली सुरक्षित नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या लहान मुलींना शाळेत पाठवताना विशेष खबरदारी घेतली पाहिजे. त्यासह मुली शाळेतून घरी आल्यावर दररोज त्यांना काही महत्वाचे प्रश्न विचारलेच पाहिजेत.

आजचा दिवस कसा होता

मुली शाळेतून घरी आल्यावर त्यांचा आजचा दिवस कसा होता असं त्यांना विचारा. तसेच मुलींची बॅग तपासा. मुलींना हा प्रश्न अगदी प्रेमाणे आणि आपुलकीने विचारा. यामुळे दिवसभरात त्यांच्याबरोबर काय काय झाले हे तुम्हाला समजेल.

शाळेत काय शिकवले?

शाळेत आपल्या मुलींना काय काय शिकवले जाते हे त्यांना विचारा. आज मुलींना काय अभ्यास दिला, त्यांना कोणती नवीन गोष्ट शिकायला मिळाली हे विचारा. त्याने मुलींच्या बुद्धीत आणि ज्ञानात काय भर पडली आहे हे तुम्हाला समजेल.

कोणते शिक्षक ओरडले का?

शाळेत जाण्यासाठी अनेक लहान मुलांना कंटाळा येतो. तुमच्या मुलांना सुद्धा कंटाळा येत असेल किंवा मुली शाळेत जात नसतील तर त्यांना कोणते शिक्षक ओरडतात का? हा प्रश्न नक्की विचारा. तसेच का ओरडतात आणि ओरडताना ते काय बोलतात हे देखील विचारा.

शाळेत कुणी त्रास देतं का?

मुली सतत रडत असतील आणि शाळेत पाठवू नये म्हणून गोंधळ करत असतील तर त्यांना कोणी त्रास देत आहे का हे विचारून घ्या. मुली त्याची उत्तरे निट देत नसतील घाबरत असतील तर त्यांना चॉकलेट द्या आणि प्रेमाणे त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घ्या.

वॉशरुमला जाताना सोबत कोण आलं होतं

प्रत्येक शाळेत लहान मुलींना वॉशरुमला जाताना शाळेतील शिपाई बाई सोबत असतात. त्यामुळे तुमच्या मुली शाळेत वॉशरुमला जातात तेव्हा त्यांच्यासोबत कोण असतं हे त्यांना विचारून घ्या. जर त्यांनी कोणत्या पुरुषाचे किंवा मुलाचे नाव घेतले तर शाळेत याबद्दल चौकशी करून तक्रार करा. तसेच महिला कर्मचाऱ्यांना मुलींसोबत वॉशरुमला पाठण्यास सांगा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

SCROLL FOR NEXT