Ashadhi Ekadashi 2024 SAAM TV
लाईफस्टाईल

Ashadhi Ekadashi 2024 : जय हरी विठ्ठल..! आषाढी एकादशी उपवासाची थाळी, बनवा झटपट शिंगाड्याचा शिरा

Special Upvas Thali : महाराष्ट्रभर वारीचा जल्लोष पाहायला मिळत आहे. विठ्ठल भक्तीत दंग होऊन वारकरी परमेश्वराची आराधना करत आहेत. अनेक लोक आषाढी एकादशीला आवर्जून उपवास करतात. या उपवासाला झटपट बनवता येईल अशी उपवासाची थाळी पाहूया.

Shreya Maskar

वारीच्या वातावरणाने संपूर्ण महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करून टाकले आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने विठ्ठल भक्ती करत आहे. कोणी वारीत सहभागी होतो तर कोणी विठ्ठल मंदिरात भक्ती करत आहे. पण आषाढी एकादशीला विठ्ठल भक्त आवर्जून उपवास करतात. आषाढी एकादशी पावसात येत असल्यामुळे उपवास करताना आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. या वर्षी आषाढी एकादशी १७ जुलै २०२४ रोजी आली आहे. पावसाळ्यात पचनशक्ती कमकुवत होते. ज्यामुळे ॲसिडीटी, डोके दुखीची समस्या उद्भवते. ही समस्या टाळण्यासाठी उपवासाच्या थाळीमध्ये या दोन पदार्थांचा नक्की समावेश करा. जाणून घ्या सहज सोपी रेसिपी

शिंगाड्याचा शिरा

साहित्य

शिंगाड्याचा शिरा बनवण्यासाठी शिंगाड्याचे पीठ, तूप, सुखामेवा, वेलची पावडर, गूळ, पाणी इत्यादी साहित्य लागते.

कृती

शिंगाड्याचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये शिंगाड्याचे पीठ मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्या. पीठाला तूप सुटल्यावर त्यामध्ये गरम पाणी टाकून शिरा शिजवून घ्या. त्यानंतर यात बारीक किसलेला गूळ टाकून सर्व छान मिक्स करून घ्या. शेवटी यामध्ये तुमच्या आवडीनुसार सुखामेवा आणि वेलची पावडर घाला. स्वादिष्ट शिंगाड्याचा शिरा तयार झाला.

उपवासाचे पराठे

साहित्य

उपवासाचे पराठे बनवण्यसाठी साबुदाणा, बटाटा, मीठ, जिरे , हिरवी मिरची, कोथिंबीर, तूप , तेल, पाणी इत्यादी साहित्य लागते.

कृती

उपवासाचे पराठे बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये साबुदाणा हलका भाजून मिक्सरला बारीक करून घ्या. या पूडमध्ये उकडलेले बटाटा कुस्करुन घाला. त्यानंतर यात चवीनुसार मीठ, जिरे, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घालून मिश्रण छान एकत्र करून घ्या. आता पाण्याच्या मदतीने पीठ छान मळून पिठाचे गोल पराठे लाटून घ्या. पराठा लाटताना पिठाचा गोळा साबुदाण्याच्या बारीक केलेल्या पिठात घोळवून घ्यायला विसरू नका. पॅनवर तेल टाकून मंद आचे‌वर पराठा खरपूस भाजून घ्या. उपवासाला तूपासोबत याचा आस्वाद घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

6,6,6,6,6...द.आफ्रिकेत Sanju Samsonचं वादळ! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

Champions Trophy 2025: टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार! या देशात होणार सामने

Uddhav Thackeray :...तर १५०० रुपये घेऊन बदलापूरला जा, नाही थोबाड फोडल्यास मला विचारा; उद्धव ठाकरे असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT