Ashadha Masik Shivratri Saam Tv
लाईफस्टाईल

Ashadha Masik Shivratri : आषाढ शिवरात्रीला या 5 राशींवर महादेवाची कृपा, नशीबात होणार मोठा बदल

Shivratri In Shravan Month : महाराष्ट्रात ही शिवरात्री आषाढ शिवरात्री म्हणून ओळखली जाईल.

कोमल दामुद्रे

Shravan Shivratri : १७ जुलै पासून महाराष्ट्रात श्रावण हा मास सुरु होत आहे. श्रावण महिना हा शंकराला अधिक प्रिय असतो. यंदा श्रावण हा २ महिने आहे. उत्तर भारतात श्रावण मास सुरु झाल्यामुळे १५ जुलै ला श्रावण शिवरात्री येत आहे. तर महाराष्ट्रात ही शिवरात्री आषाढ शिवरात्री म्हणून ओळखली जाईल.

श्रावणात भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी भक्त उपवास ठेवतात आणि भगवान शंकराचा जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करतात. शिवरात्री दर महिन्याला येते आणि या महिन्यात शिवरात्री 15 जुलैला म्हणजे आज आली आहे. आज शुभ वृध्दि योगासोबतच सूर्य कर्क राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळे या ५ राशींवर महादेवाची कृपा होणार आहे हे जाणून घेऊया

1. कन्या

कन्या राशीसाठी ही शिवरात्री नोकरीत (Job) बढती देईल. तसेच कुटुंबात (Family) आनंदाचे वातावरण असेल. कामाच्या ठिकाणी इतर सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. वेळेप्रसंगी मदत मिळेल.

2. सिंह

शंकराच्या कृपेने सिंह राशीच्या लोकांना धनलाभ होईल. व्यवसायात (Business) नफा मिळेल. नोकरीच्या शोधात असाल तर यश मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल होतील.

3. धनु

महादेवाच्या कृपेने तुमची लव्ह लाईफ मजबूत होईल. व्यवसाय महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी आहे. नोकरी यश मिळेल, समाजात मानसन्मान वाढेल. या काळात कौटुंबिक वातावरण आनंदाने भरलेले राहील.

4. मकर

मकर राशीच्या लोकांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. करिअरमध्ये प्रगती होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमची प्रशंसा होईल. तुमच्या मेहनतीची, प्रयत्नांची ओळख आणि प्रशंसा केली जाईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. मित्र आणि नातेवाईकांकडून विशेष बातमी मिळू शकते. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदाने भरलेले असेल.

5. कुंभ

कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात यशाच्या अपार शक्यता घेऊन येऊ शकते. वडिलांकडून सहकार्य मिळेल तर सरकारी नोकरीत असलेल्यांना प्रगती मिळू शकते. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध क्रिकेटपटूची राजकारणात एण्ट्री; हाती घेतलं कमळ,भाजपमध्ये सामील होताच मिळाली मोठी जबाबदारी

Pune News : पुण्यात भाजपला धक्का! बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, राजकारणात मोठी घडामोड

फालतू भानगडी करताय! भाजपला संपवायला निघाले का? सुधीर मुनगंटीवारांची ऑडिओ क्लिप व्हायरल

Weather Update: ११ राज्यांवर पावसाचं संकट! वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा

मुंबईत तरुण-तरुणीला बेदम मारहाण; अल्पवयीन गार्डन गँगचा धुडगूस

SCROLL FOR NEXT