AI Copy Your Voice saam tv
लाईफस्टाईल

AI Copy Your Voice: सावधान! सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करण्याची हौस पडेल महागात, आर्टिफिशियल इंटेलिजन्स चोरतोय तुमचा आवाज

Artificial Intelligent : सध्या अनेकांनामध्ये रील्स व व्हॉइस ओव्हरचा क्रेझ वाढलेला पाहायला मिळत आहे.

कोमल दामुद्रे

Voice Cloning : सोशल साइट्सची क्रेझ लोकांमध्ये सातत्याने वाढत आहे. सोशल मीडियावरुन अनेकांना पैसे कमावण्याची संधी मिळाली आहे. या माध्यामातून अनेकांना आपले कलाकौशल्य देखील दाखवता येते.

सध्या अनेकांनामध्ये रील्स व व्हॉइस ओव्हरचा क्रेझ वाढलेला पाहायला मिळत आहे. परंतु, प्रत्येक वयोगटातील लोकांना याची भूरळ पडली आहे. तुम्हाला माहित आहे का? सोशल साईट्सवर व्हिडीओ पोस्ट करण्याची हौस महागात पडू शकते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आवाजाची चोरी केली जात आहे.

1. आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून आवाज चोरला जाऊ शकतो

असे होऊ शकते की तुम्हाला कॉल (Call) आला आणि समोरची व्यक्ती तुम्हाला सांगेल की तो तुमचा मुलगा, पती किंवा मित्र आहे. आवाजामुळे तुमची फसवणूक (Fraud) होऊ शकते. असे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने हा आवाज चोरला जाऊ शकतो.

2. तुमचा आवाज चोरून तुम्हाला फसवू शकतात.

हा धक्कादायक खुलासा कॅनडातून समोर आला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने एका वृद्ध जोडप्याचा आवाज चोरून फसवले गेले. वृद्ध जोडप्याचा फोन आला. फोनवरील आवाज त्याच्या नातू ब्रँडन पार्किंग्टनचा होता, जो दुसऱ्या गावात राहत होता. ब्रँडन त्याच्या आजोबांशी बोलतो आणि म्हणतो की मी अडचणीत आहे. मी तुरुंगात आहे आणि मला बाहेर पडण्यासाठी पैशांची गरज आहे. त्याने सांगितले की तो त्याच्या वकिलाच्या नंबरवरून कॉल करत आहे. यानंतर त्यांचे वकीलही बोलले आणि तुम्ही १८ लाख रुपये ट्रान्सफर (Transfer) करा, असे सांगितले.

3. वृद्ध दाम्पत्याची १८ लाखांची फसवणूक

नातवाचा आवाज ऐकून वृद्ध दाम्पत्य अस्वस्थ झाले. हा आवाज आपल्या नातवाचा आहे हे त्यांना समजले होते आणि त्याला कोणत्याही परिस्थितीत मदत करायची होती. त्याने बँकेत जाऊन 3000 कॅनेडियन डॉलर्स म्हणजेच 18 लाख रुपये काढले आणि बॅटिकॉनच्या माध्यमातून त्या वकिलाकडे हस्तांतरित केले, पण हा आवाज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्याद्वारे चोरला गेला होता.

4. नातवाचा आवाज youtube वरून कॉपी केला आहे

त्यांच्या नातवाचे काही व्हिडिओ यूट्यूबवर होते. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने त्या व्हिडीओजमधून ब्रेंडनचा आवाज काढण्यात आला आणि त्यानंतर नेमका आवाज तयार करण्यात आला. नातवाचा हा आवाज ऐकून खुद्द त्याच्या आजोबांनाही शंका आली नाही आणि त्यांनी पैसे ट्रान्सफर केले.

5. सोशल साइट्सवरून आवाज काढला जात आहे

तुम्ही तुमच्या मौजमजेसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर अपलोड करत असलेल्या व्हिडिओंच्या मदतीने तुमच्या नातेवाईकांना फोन करून तुमच्या आवाजाची कॉपी करून पैशांची मागणी केली जात आहे. अशा फसवणुकीच्या घटना आपल्या देशातही आल्या आहेत. आवाजात बदल होत नसल्याने कोणालाच शंका येत नाही.

6. हा सापळा डिफेक तंत्रज्ञानाने विणला जात आहे

कृत्रिम बुद्धिमत्ता ही कृत्रिमरित्या विकसित केलेली बौद्धिक क्षमता आहे. यामध्ये डीपफेक तंत्र आहे. या तंत्राच्या मदतीने कोणाच्याही आवाजाचा, फोटोचा किंवा व्हिडिओचा नमुना घेऊन क्लोनिंग केले जाते. या तंत्राने तयार केलेले हे ऑडिओ-व्हिडीओ इतके खरे आहेत की तुमचाच आवाज ऐकून तुम्ही स्वतः गोंधळून जाल. अशा फसवणुकीचे अनेक गुन्हे देशभरात नोंदवले गेले आहेत. पूर्वी हे फक्त परदेशातच होत होते, पण आता इथेही अशा फसवणुकीचे प्रकार खूप वाढले आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्ही फेसबुक किंवा इतर कोणत्याही साइटवर तुमचे व्हिडिओ पोस्ट करत असाल तेव्हा काळजी घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

Trump Putin Summit : भारतावरचा टॅरिफ रद्द होणार? ट्रम्प-पुतीन भेटीत काय घडलं?

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवात ७५ गोविंदा जखमी, काहींची प्रकृती गंभीर, एकाचा मृत्यू

Dog Bite: दिसेल त्याचे तोडले लचके;इंदापुरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ,सीसीटीव्हीत घटना कैद

SCROLL FOR NEXT