Knee strengthening exercises saam tv
लाईफस्टाईल

Knee strengthening exercises: गुडघ्यांमधून कटकट आवाज येतोय? गुडघ्यांच्या मजबूतीसाठी घरच्या घरी करा हे 5 सोपे व्यायाम

Exercises for strong knees: वाढत्या वयात गुडघ्यांची ताकद आणि लवचिकता टिकवणं महत्त्वाचं आहे. वॉल स्क्वॉट्स, क्लॅमशेल्स, लंजेस, हॅमस्ट्रिंग स्ट्रेच आणि हील स्लाइड्स हे पाच सोपे व्यायाम घरच्या घरी कसे करावेत, जाणून घ्या आणि गुडघ्यांची काळजी घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

वाढत्या वयासोबत शरीराच्या अनेक भागांमध्ये बदल होऊ लागतात. त्याचा परिणाम गुडघ्यांच्या आरोग्यावरही होऊ शकतो. गुडघे हा शरीरातील महत्त्वाचा सांधा आहे. चालणं, उठणं, बसणं अशा अनेक हालचालींसाठी गुडघ्यांचा उपयोग होतो. आपण टाकत असलेल्या प्रत्येक पावलाचा भारही गुडघ्यांवर पडतो.

पण शारीरिक हालचाली कमी झाल्या आणि वय वाढू लागलं की गुडघ्यांचं आरोग्य बिघडू शकतं. त्यामुळे गुडघे मजबूत ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही घरच्या घरी काही सोपे व्यायाम करू शकता. जाणून घेऊया तुम्ही कोणते ५ व्यायाम करू शकता.

भिंतीच्या आधाराने स्वॉट्स (Wall Squats)

या व्यायामासाठी सर्वप्रथम भिंतीपासून साधारण एक फूट अंतरावर उभे राहा. दोन्ही पाय खांद्यांच्या रुंदीइतके दूर ठेवा. आता पाठीचा भाग भिंतीला टेकवून हळूहळू खाली सरका. यावेळी गुडघे वाकवा. पण गुडघे पायाच्या बोटांच्या पुढे जाणार नाहीत याची काळजी घ्या. त्यानंतर हळूहळू पुन्हा सरळ उभं राहा.

क्लॅमशेल व्यायाम (Clamshells)

गुडघ्यांची लवचिकता वाढवण्यासाठी हा व्यायाम फायदेशीर ठरू शकतो. यासाठी आधी जमिनीवर एका कुशीवर झोपा. दोन्ही गुडघे ९० अंशात वाकवून ठेवा. दोन्ही पाय एकमेकांना जोडलेले ठेवा. आता पाय एकत्र ठेवून गुडघे हळूहळू वरच्या बाजूला उघडा आणि पुन्हा बंद करा. शिंपल्याचं तोंड उघडावं आणि बंद व्हावं, तशी ही हालचाल दिसते. २०२४ मध्ये 'जर्नल ऑफ पॉप्युलेशन थेरप्युटिक्स अँड क्लिनिकल फार्माकोलॉजी'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार, हा व्यायाम केल्याने गुडघा वाकवण्याच्या क्षमतेत सुधारणा झाल्याचं दिसून आलं.

लंजेस (Lunges)

हा व्यायाम करण्यासाठी एका पायाने पुढे आणि दुसऱ्या पायाने मागे अशा स्थितीत उभं राहा. उजवा पाय पुढे आणि डावा पाय मागे ठेवा. आता हळूहळू दोन्ही गुडघे वाकवत खाली या. उजवा पाय काटकोनात येईल इतपत खाली जा. त्यानंतर पुन्हा सावकाश सरळ उभं राहा. आता दोन्ही पायांची जागा बदला आणि पुन्हा हाच व्यायाम करा.

मांडीच्या मागच्या स्नायूंचा व्यायाम (Hamstring Stretch)

हा व्यायाम करण्यासाठी खुर्चीच्या कडेला बसा. डावा पाय सरळ ठेवा आणि उजवा पाय गुडघ्यातून वाकवा. सरळ ठेवलेल्या पायाची टाच जमिनीवर टेकवा. आता छातीचा भाग हळूहळू त्या पायाच्या दिशेने पुढे झुकवा. यामुळे मांडीच्या मागच्या बाजूचे स्नायू ताणले जातात. तसंच गुडघ्याचे स्नायूही आवळले जातात.

हील स्लाइड्स (Heel Slides)

गुडघ्यांची हालचाल सुधारण्यासाठी आणि त्यांची लवचिकता वाढवण्यासाठी हा व्यायाम उपयोगी ठरतो. यासाठी पाठीवर झोपा. दोन्ही गुडघे वाकवून पाय जमिनीवर टेकवा. आता एका पायाची टाच जमिनीवरून न उचलता हळूहळू पुढे सरकवा आणि पाय सरळ करा. त्यानंतर पुन्हा टाच मागे सरकवत पाय आधीच्या स्थितीत आणा.

गुडघे मजबूत ठेवण्यासाठी व्यायाम का गरजेचा?

गुडघ्यांच्या सांध्यांची नियमित हालचाल होणं महत्त्वाचं आहे. चालणं, स्ट्रेचिंग आणि शरीराची लवचिकता वाढवणारे व्यायाम केल्याने गुडघे एक्टिव्ह आणि मजबूत राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे गुडघ्यांचं आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सूज कमी करायची आहे? करून बघा हे 5 नैसर्गिक उपाय

New Marathi Serial : 'याड' नाही तर 'ओढ' लावणारी लव्हस्टोरी! नव्या मराठी मालिकेची घोषणा, मुख्य भूमिकेत कोण अन् रिलीज डेट काय?

Maharashtra News Live Update: BMC-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नांदेड विमानतळावर आगमन

Pune Crime: पुणे हादरले! भररस्त्यात शिक्षिकेची हत्या, धारदार शस्त्राने वार करत जागीच संपवलं

Dinkache Ladoo Recipe : महिनाभर टिकतील असे खमंग डिंकाचे लाडू; थंडीसाठी तयार करा पौष्टिक खाऊ, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT