Pimples On Lips Saam Tv
लाईफस्टाईल

Pimples On Lips : ओठांवरील पिंपल्सने त्रस्त आहात ? तर अशाप्रकारे दूर करा

Lips Care : चेहऱ्यावर पिंपल्स येणे, पुरळ उठणे, डाग या सामान्य समस्या झालेल्या आहेत.

कोमल दामुद्रे

Pimples On Lips : चेहऱ्यावरील सौंदर्य टिकवण्यासाठी आपण विशेष काळजी घेत असतो. कारण चेहऱ्यावरील त्वचेसंबधित समस्या सतत उद्भवत असतात. चेहऱ्यावर पिंपल्स येणे, पुरळ उठणे, डाग या सामान्य समस्या झालेल्या आहेत.

मात्र चेहऱ्यावर (Skin) पिंपल्स येण्याची समस्या जर ओठांवर उद्भवत असेल तर वेदना खूप होतात. ओठांवरील पिंपल्स येण्याचे कारण काय आहे? असा प्रश्न तुम्हाला सतत पडत असेल. तर आज या लेखात तुमच्या प्रश्नाची उत्तरे मिळतील त्यासोबतच ओठांवरील पिंपल्स (Pimples) दूर करण्यासाठी उपायसुद्धा सांगणार आहोत.

1. ओठांवरील पिंपल्स येण्याचे कारण

Stylecrase.com मध्ये प्रकशित केलेल्या बातमीनुसार, त्वचेवर क्लोग्डची परिस्थिती निर्माण झाल्याने ओठांच्या त्वचेवर आणि इतर भागांवर पिंपल्स येण्याचे हे एक मोठे कारण आहे. त्यासोबतच बाहेरील प्रदूषणामुळे (Pollution), ताणतणावमुळे पिंपल्सची समस्या उद्भवते.

ओठांना आकर्षित दिसण्यासाठी वापरले जाणारे कॉस्मेटिकस, लिपस्टिक, लीप ग्लॉस यामुळेही ओठांनावर मुरूम त्यात होऊ शकतात. कारण ब्युटी प्रोडक्ट्स मध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलचा वापर केला जातो यामुळे बऱ्याच वेळा त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो.

तुमच्या आहाराशी (Food) संबंधित चुका देखील ओठांवर किंवा त्वचेवरील मुरूम येण्याचे महत्वाचे कारण आहे. त्यामुळे निरोगी आहाराची दिनचर्या पाळणे गरजेचे आहे ज्याने तुम्हाला हायड्रेटेड त्वचा आणि चमकदार त्वचा राहण्यास मदत मिळते.

2. ओठांवरील पिंपल्स दूर राहण्यासाठी

A. गरम आणि कोल्ड कॉम्प्रेस

ओठांवरील पिंपल्स दूर करण्यासाठी तुम्ही गरम आणि कोल्ड कॉम्प्रेस या पद्धतीचा वापर करू शकता. कोल्ड कॉम्प्रेस या पद्धतीचा वापर करण्यासाठी कपड्यात बर्फ टाकून पिंपल्सवर लावा तसेच गरम कॉम्प्रेस पद्धतीचा वापर करण्यासाठी एक सुत्ती कापड गरम करून त्या कापडाच्या मदतीने ओठांना प्रेस करा.

B. एरंडेल तेल

एरंडेल तेलमध्ये असलेले ऍझेलेइक ऍसिड पिंपिल्सवर उपचार करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. त्यासाठी तुम्हाला केवळ प्रथम कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करून नंतर त्वचेवर एरंडेल तेल लावावे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Hidden Inside Scooter: अरे बापरे बाप! स्कुटीला स्टार्टर मारणार तोच फुसफुसला, हेडलाइटमध्ये लपला होता विषारी साप, VIDEO

Maharashtra Live News Update : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

Veg Biryani Recipe : स्ट्रीट स्टाइल चटपटीत व्हेज बिर्याणी, एकदा खाल तर खातच रहाल

Accident : ऐन सणासुदीत ८ जणांचा अपघाती मृत्यू, पिकअप 100 फुटावरून कोसळला; चांदसैली अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट समोर

Bihar Elections: एनडीएला मोठा धक्का; निवडणूक न लढताच गमावली एक जागा ? काय कारण, पराभूत उमेदवार कोण?

SCROLL FOR NEXT