Dandruff Hair Mask Saam Tv
लाईफस्टाईल

Dandruff Hair Mask : केसातील कोंड्याच्या समस्येने त्रस्त आहात ? जास्वंदीचं फुल ठरले बहुगुणी !

Hibiscus Hair Mask : आजकाल बिघडलेली जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केसांवर वाईट परिणाम होत आहेत

कोमल दामुद्रे

Hair Care Tips : आजच्या काळात केस हे आपल्या सौंदर्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आजकाल बिघडलेली जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे केसांवर वाईट परिणाम होत आहेत त्यामुळे केसांच्या अनेक समस्यांना अनेकजण त्रासलेले आहे. त्यातील एक कोंड्याची समस्या.

उन्हाळ्यात (Summer) घामामुळे आपल्या केसांमध्ये ओलावा निर्माण होतो. केस सतत ओले राहिल्यामुळे कोंडयासारखी सम स्या निर्माण होते. धूळ आणि वाढत्या प्रदूषणामुळे केस गळणे, तुटणे आणि केस गळणे (Hair Falls) ही सामान्य गोष्ट झाली आहे. पण कोंडामुळे अनेकजण खूप अस्वस्थही असतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर, जास्वंदीच्या फुलांपासून बनवलेल्या हेअर मास्कने तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता.

1. जास्वंदीचे फुल व दहीचा हेअर मास्क

1. साहित्य

  • 1 टीस्पून एलोवेरा जेल

  • एक चमचा दही (Curd)

  • जास्वंदीची फुले आणि पाने

2. कृती

  • केसांचा हेअर मास्क तयार करण्यासाठी, प्रथम जास्वंदीची फुले आणि पाने पूर्णपणे धुवा.

  • आता फुले व पाने मिक्सरमध्ये टाकून नीट वाटून घ्या.

  • यानंतर त्यात एक चमचा एलोवेरा जेल आणि एक चमचा दही घाला.

  • आता या सर्व गोष्टी नीट मिसळा.

  • कोंडा साठी जास्वंदी फुले आणि पाने केस मास्क तयार आहे.

3. वापर कसा कराल ?

  • हा तयार हेअर मास्क केसांच्या मुळांवर आणि टाळूवर पूर्णपणे लावा.

  • आता हा हेअर मास्क केसांवर 20 मिनिटे राहू द्या.

  • 20 मिनिटांनंतर आपले केस सौम्य शैम्पूने धुवा.

  • या हेअर मास्कचा वापर करून तुम्ही कोंड्याच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता.

2. जास्वंदीचे फुल व मेथी हेअर मास्क

1. साहित्य

  • 3-4 जास्वंदीची फुले

  • 1 टीस्पून मेथी दाणे

  • १/४ कप ताक

2. कृती

  • हेअर मास्क बनवण्यासाठी प्रथम एक चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.

  • आता हे मेथी दाणे आणि जास्वंदीची फुले मिक्सरमध्ये बारीक करून घट्ट पेस्ट तयार करा.

  • यानंतर या पेस्टमध्ये 1/4 कप ताक घाला आणि चांगले मिसळा.

  • डोक्यातील कोंडा साठी जास्वंदी होममेड हेअर मास्क तयार आहे.

3. कसे वापराल ?

  • हा हेअर मास्क ब्रशच्या मदतीने केसांना लावा.

  • स्कॅल्पसोबतच केसांना चांगले लावा आणि अर्धा तास तसाच राहू द्या.

  • ठराविक वेळेनंतर केस चांगले धुवा.

  • आठवड्यातून एकदा हा हेअर मास्क वापरणे फायदेशीर ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT