Banana Hair Mask : फक्त 21 दिवसांत केस होतील लांब, काळे व घनदाट, ट्राय करा बनाना हेअर मास्क

Hair Growth Tips : काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची केस गळतीही थांबेल व काळेभोर केस होण्यास मदतही होईल.
Banana Hair Mask
Banana Hair MaskSaam Tv
Published On

Hair Care Tips : लांबसडक काळेभोर केस कोणाला नको हवे असतात. बदलेल्या जीवनशैलीनुसार आपल्या प्रत्येकाला लांबसडक केस हवे असतात. परंतु, प्रदूषण व खाण्यापिण्याच्या सवयींमुळे आपले केस खराब होतात.

केसांची (Hair) वाढ देखील थांबली जाते. यामुळे केसांना हवे तसे पोषक मिळत नाही व लांबसडक केस होण्याऐवजी त्यांची अधिक गळती होऊ लागते. यासाठी आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची केस गळतीही थांबेल व काळेभोर केस होण्यास मदतही होईल.

Banana Hair Mask
Curly Hair Looks : या टिप्स फॉलो करा अन् तुमच्या कुरळे केसांना स्टायलिश लुक द्या

काळेभोर केसांसाठी केळी उपयुक्त ठरु शकते. केळीमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात, जे पचन, हृदय, वजन कमी करणे आणि इतर अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, केळी तुमच्या केसांसाठीही खूप फायदेशीर (Benefits) आहे.

तुम्ही याचा वापर करून अनेक प्रकारचे हेअर पॅक बनवू शकता, ज्यामुळे तुमचे केस मजबूत होऊ शकतात. केळीमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन (Vitamins)-सी, मॅग्नेशियम, प्रोटीन यांसारखे पोषक घटक आढळतात, जे केसांचे पोषण करतात. चला तर मग जाणून घेऊया, केळ्यापासून (Banana) हेअर मास्क कसा बनवायचा.

Banana Hair Mask
Excess Hair Loss : प्रमाणापेक्षा जास्त केस गळताय ? वैतागले आहात ? रोजच्या आहारात करा हे बदल

1. केळी, पपई आणि मध

केस चमकदार करण्यासाठी तुम्ही या हेअर मास्कचा वापर करू शकता. हा पॅक बनवण्यासाठी प्रथम केळी मॅश करा, आता पपईचे चौकोनी तुकडे करून मॅश करा. दोन्ही एकत्र मिसळा. त्यात एक चमचा मध घाला. आता हा पॅक केसांना लावा. साधारण ३० मिनिटांनी केस धुवा.

2. केळी आणि दही पॅक

दही आणि मध हे नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतात. केळीमध्ये मिसळून हेअर पॅक बनवू शकता. यासाठी पिकलेली केळी मॅश करून त्यात दही आणि मध टाका. हे मिश्रण टाळूवर लावा. काही वेळाने शॅम्पूने धुवा.

Banana Hair Mask
Hair Fall Remedies: रोज गळणाऱ्या केसांनी तुम्ही देखील वैतागले आहात ? तज्ज्ञांनी दिले हे 5 उपाय

3. केळी आणि अंडी मास्क

अंड्यातील प्रोटीन केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे. अंडी, केळी आणि मध मिसळून हेअर मास्क बनवता येतो. जे केसांसाठी नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. ते बनवण्यासाठी दोन पिकलेली केळी मॅश करून त्यात मध घाला. आता अंडी घालून फेटून घ्या. हा पॅक केसांना लावा, 20-30 मिनिटांनी शॅम्पूने धुवा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com