आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी झोप ही अन्न आणि पाण्याइतकीच आवश्यक आहे. पण अनेकदा जेव्हा आपण जास्त झोपतो तेव्हा त्यामागे केवळ थकवा हेच कारण नसतं. मुळात हे मानसिक आरोग्याच्या समस्येचंही लक्षण असू शकतं. लोक अनेकदा 'कदाचित मी खूप थकलो असेन' असा विचार करून जास्त झोपेकडे दुर्लक्ष करतात. मात्र सतत जास्त झोप येणं किंवा हायपरसोम्निया हे डिप्रेशन, स्ट्रेस यांसारख्या काही मानसिक स्थितींचं लक्षण असू शकतं.
क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ मालिनी साबा यांनी स्पष्ट केलं की, जास्त झोपेव्यतिरिक्त अशी आणखी पाच महत्त्वाची लक्षणं आहेत जी मानसिक आजार असल्याचे संकेत देतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. ही लक्षणं काय आहेत ती जाणून घेऊ
रात्री ८-१० तास झोपूनही जर तुम्हाला दिवसभर सुस्त आणि थकल्यासारखं वाटत असेल तर हे सामान्य नाही. अशा लक्षणांमध्ये वारंवार काहीतरी खाण्याची तीव्र इच्छा होणं, लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं आणि शरीर जड वाटणं यांचा समावेश होतो. ही स्थिती अनेकदा मानसिक थकवा किंवा नैराश्याशी संबंधित असू शकते.
ज्यावेळी मानसिक आरोग्यावर परिणाम होतो तेव्हा व्यक्ती हळूहळू आपल्या दैनंदिन कामांपासून दूर जाऊ लागते. यामुळे कामात किंवा अभ्यासात रस नसणं, लहान जबाबदाऱ्या टाळणं अशी परिस्थिती निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत झोप हा एक पळवाटेचा मार्ग बनतो.
जर तुम्हाला जास्त झोपेसोबत सतत उदासी किंवा रिकामेपणा जाणवत असेल तर हे एक गंभीर लक्षण असू शकतं. या काळात व्यक्तीला कशातच आनंद मिळत नाही. अशावेळी व्यक्ती स्वतःला एकटा समजतो. ही लक्षणं अनेकदा नैराश्य किंवा दीर्घकालीन स्ट्रेसमध्ये दिसून येतात.
तणावामुळे नेहमीच जास्त झोप येते असं नाही. काही लोकांना स्ट्रेसमुळे झोप लागत नाही. तर काही जण दिवसा झोपतात आणि रात्रभर जागे राहतात. यामुळे दिवस-रात्रीचं संतुलन बिघडतं. हे शरीराच्या बायलॉजीकल क्लॉक बिघाडल्याचं लक्षण असू शकतं.
मानसशास्त्रीय दृष्ट्या, जास्त झोप घेणं हा अनेकदा तणाव किंवा अतिविचारांपासून स्वतःचं संरक्षण करण्याचा एक मार्ग असतो. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत हे खरं ठरेल असं नाही. हा आळस नसून, मेंदूला विश्रांतीची गरज असल्याचं हे एक लक्षण असतं.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.