drinking less water saam tv
लाईफस्टाईल

Dehydration: तुम्ही दिवसाला अर्धा लिटरपेक्षा कमी पाणी पिताय? तर शरीरावर होतील गंभीर परिणाम, तज्ज्ञांनी नेमकं काय सांगितलं?

Kidney Health: हिवाळ्यात तहान कमी लागल्यामुळे अनेक लोक पाणी कमी पितात. मात्र ही सवय शरीरावर गंभीर परिणाम करू शकते. किडनी, मेंदू आणि हार्टवर याचा थेट दुष्परिणाम होतो.

Sakshi Sunil Jadhav

दिवसाला अर्धा लिटरपेक्षा कमी पाणी पिणे आरोग्यास गंभीर हानी पोहोचवू शकते.

डिहायड्रेशनमुळे किडनी, मेंदू आणि हार्टच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

हिवाळ्यातही शरीराला पुरेसे पाणी आवश्यक असते.

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यातच हिवाळा असल्यामुळे अनेकांना तहान लागत म्हणून लोक पाणी सुद्धा कमी प्रमाणात पितात. याचा थेट परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. एका संशोधनातून असे सत्य समोर आले आहे की, जे लोक दिवसाला ५०० एम एल पेक्षा कमी पाणी पितात त्यांच्या लघवीत अडथळे निर्माण होतात. तसेच फिल्टरेशन प्रक्रिया मंदावते आणि भविष्यात किडनीशी संबंधित धोका वाढू शकतो.

अनेकांना वाटतं डिहायड्रेशन ही समस्या फक्त उन्हाळ्यातच जाणवते. मात्र हे संशोधनानुसार असत्य ठरले आहे. कारण याचा परिणाम थेट आपल्या किडनीवर होत असतो. किडनी ही आपल्या शरीरात महत्वाचे फिल्टरिंग सिस्टिमचे काम करत असते. त्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असणे महत्वाचे असते. यामुळे लघवीचा रंग गडद दिसतो.

पाण्याचे कमी प्रमाणात सेवन केल्याने फक्त किडनीवरच नाही तर मेंदू, हार्ट आणि ब्लड प्रेशरवरही परिणाम होतो. शरीरातील रक्तप्रवाह कमी झाल्याने हार्ट वेगाने काम करतं. मेंदूपर्यंत कमी प्रमाणात ऑक्सिजन पोहोचल्याने डोकेदुखी, चिडचिडपणा, थकवा वाढतो. अनेकदा लोक ही लक्षणे ताण किंवा झोप कमी झाल्यामुळे होतायेत असं समजतात, पण त्यामागे डिहायड्रेशन असू शकते.

पाणी कमी घेतल्यास पचनक्रिया मंदावते आणि शरीरातील हार्मोन्सची संतुलन प्रणालीही प्रभावित होते. अशा वेळी जेवणाचे संकेत मेंदूपर्यंत योग्य वेळी पोहोचत नाहीत, ज्यामुळे भूक कमी-जास्त होणे, बद्धकोष्ठता किंवा पोटफुगीची समस्या निर्माण होऊ शकते.

बराचवेळ पाणी कमी पिण्याची सवय शरीरावर गंभीर परिणाम करू शकते. कारण त्याने शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यात अडचण येते, किडनीचे आजार आणि स्टोनच्या समस्या वाढण्याचा धोका वाढतो आणि शरीरातील फिल्टरेशन प्रक्रिया कमकुवत होते.

टीप: शरीराच्या गरजा ओळखून नियमितपणे पाणी पिण्याची सवय लावली तर अशा समस्या सहज टाळता येऊ शकतात. तहान लागेपर्यंत वाट पाहू नका. कारण तेव्हा शरीर आधीच डिहायड्रेशन मोडमध्ये गेलेले असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी करताना चूक झाली, आता काय कराल? लाडक्या बहि‍णींसाठी सरकारची मोठी घोषणा

Urad Dal Recipe: नाश्त्याला बनवा उडीदाच्या डाळीचे खमंग, खुसखुशीत वडे, सर्वजण आवडीने खातील

Kitchen Hacks: गॅसवर ठेवताच दूध पटकन फाटते? गरम करताना ही गोष्ट लक्षात ठेवाच

Leopard : ४ पाय कापलेले, १८ नखे गायब, ऊसाच्या शेतात आढळला बिबट्याचा मृतदेह, साताऱ्यात खळबळ

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

SCROLL FOR NEXT