Nomophobia Disease Saam Tv
लाईफस्टाईल

Nomophobia Disease : धक्कादायक! देशात चारपैकी तीन व्यक्तींना Nomophobia आजार? तज्ज्ञांनी सांगितले कारण

Smartphone Side effects : स्मार्टफोनमुळे जितक्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तितकेच त्याचे दुष्परिणाम देखील आहे.

गोपाल मोटघरे

Smartphone Anxiety : जगभरातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटकच बनला आहे. स्मार्टफोनमुळे जितक्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तितकेच त्याचे दुष्परिणाम देखील आहे. स्मार्टफोनमुळे तरुणपिढी अनेक आजारांना सामोरे जावे लागते आहे.

या स्मार्टफोनमुळे असा एक घातक आजार (Disease) समोर आला आहे तो म्हणजे नोमोफोबिया. आपल्या देशात चारपैकी तीन व्यक्ती 'नोमोफोबिया' ने ग्रस्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज अनेकांसाठी त्यांचा स्मार्टफोन (Smartphone) हेच त्यांचे विश्व बनलेले आहे.

त्याशिवाय त्याच्या आयुष्याची कल्पनाच करता येत नाही. हेच कारण आहे की, आजघडीला देशातील दर चार व्यक्तींपैकी तीन जण हे 'नोमोफोबिया'ने ग्रस्त आहेत. काऊंटरपॉईंट, ओप्पोने संयुक्तपणे केलेल्या एका पाहणीत हे वास्तव समोर आल आहे.

1. 'नोमोफोबिया' म्हणजे काय?

नो मोबाईल फोन म्हणजे नोमो फोबिया आपला मोबाईल आपल्यापासून दुरावेल अशी सत्त वाटणारी भीती. इंटरनेट बंद पडेल का ? फोन हरवेल का ? त्याची बॅटरी (Battery) संपेल का ? असे विचार 'नोमोफोबिया'ग्रस्त व्यक्तीच्या डोक्यात सतत घोंघावतात. त्यातून अनेकांना असहाय समजणे, चिंताग्रस्त होणे, तसेच भावनिक अस्वस्थतेलाही सामोरे जावे लागते.

पुण्यातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नितीन अभिवंत म्हणतात की, महिलांच्या तुलनेत ८२% पुरुषांना मध्ये मोबाईलबद्दलची चिंता अधीक सतावत आहे. तर ४२% जण केवळ मनोरंजन, सोशल मीडियासाठी स्मार्टफोन वापरत आहेत. त्यामुळे या आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या मोबाईलचा वापर ओळखा, सवताच्या गरजेपुरता मोबाईलचा वापर करा, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

Famous Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने बॉयफ्रेंडशी बांधली लग्नगाठ, VIDEO होतोय व्हायरल

Raj Thackeray: 'यांना मुंबई हे नाव खटकतंय...' केंद्रीय मंत्र्याला राज ठाकरेंनी झापलं

Guru Gochar 2025: पुढच्या वर्षी या राशींवर गुरुची राहणार कृपा; अडकलेला पैसा आणि नवी नोकरीही मिळू शकते

Pune News: पुण्यात बिबट्यानंतर माकडांची दहशत, सोसायटीत माकडांची घुसखोरी

SCROLL FOR NEXT