Toxic Relationship Saam Tv
लाईफस्टाईल

Toxic relationship: प्रेमाच्या नावाखाली तुम्हीही टॉक्सिसिटीचा सामना करत नाहीये ना? जाणून घ्या संकेत

Relationship red flags: अति भांडण, संशय, इमोशनल ब्लॅकमेल आणि जोडीदारावर सतत दोष टाकणे या गोष्टी अनेकदा प्रेम समजल्या जातात. मात्र या सवयी नात्यातील टॉक्सिसिटीची चिन्हे असू शकतात. हेल्दी रिलेशनशिपसाठी या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका.

Surabhi Jayashree Jagdish

कोणतंही नातं टिकवण्यासाठी जुळवून घेणं आवश्यक असतं. हे तुम्ही घरातील वडीलधाऱ्यांकडून अनेकदा ऐकलं असेल. मात्र आजच्या तरुणांना प्रश्न पडतो की, त्यांनी किती काळ जुळवून घ्यावं. कोणत्याही नात्यात जुळवून घेण्याला एक मर्यादा असते. कधीकधी, आपण नात्यातील टॉक्सिक घटकांना प्रेम समजण्याची चूक करतो. चला, अशा काही सवयी जाणून घेऊया ज्यांना आपण अनेकदा चांगल्या समजण्याची चूक करतो.

कोणत्याही हेल्दी रिलेशनशिपमध्ये तुमचा जोडीदारच सर्वस्व नसतो. असं करणं तुमच्या नात्यासाठी योग्य नाही. जर तुम्ही तुमच्या जोडीदारालाच सर्वस्व मानत असाल तर त्यामुळे तुमच्या नात्यात केवळ एका व्यक्तीचं पारडं जड असू शकतं.

अति भांडण हे प्रेमाचं लक्षण

लोक अनेकदा म्हणतात की, भांडण हे प्रेमाचं लक्षण आहे. काहीजण तर असंही म्हणतात की, अति भांडण हे प्रेमाचं लक्षण आहे. तथापि अति भांडण हे नात्यातील टॉक्सिसिटीचं लक्षण आहे. छोटं भांडण ठीक आहे पण अति भांडणामुळे नातेसंबंध कमकुवत होतात.

जोडीदारावर दोष टाकणं

जेव्हा एखादी चूक होते तेव्हा संपूर्ण दोष आपल्या जोडीदारावर टाकणं किंवा भांडणादरम्यान 'कधीच नाही' किंवा 'नेहमीच' यांसारखे शब्द वापरणं हे देखील चुकीचं आहे. उदाहरणार्थ भांडणादरम्यान 'नेहमी तुझीच चूक असते' असं म्हणण्याने नातेसंबंधाला तडा जाऊ शकतो.

प्रेमाच्या नावाखाली संशय

कधीकधी ज्यावेळी तुम्ही तुमच्या मित्रांना भेटता तेव्हा तुमच्या जोडीदाराला तुमच्यावर संशय येऊ लागतो. हा संशयसुद्धा प्रेमाच्या नावाखाली येतो. काही काळानंतर नात्यात घुसमट जाणवू लागते ज्यामुळे ते बिघडू शकतं.

इमोशनल ब्लॅकमेल

कधीकधी जोडीदार नातं तोडण्याची धमकी देतात जे पूर्णपणे चुकीचं आहे. नातं तोडणं हा इमोशनल ब्लॅकमेलचाच एक प्रकार आहे. अशा धमक्यांचा दुसऱ्या जोडीदाराच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मुळात इमोशनल ब्लॅकमेल हे अत्यंत धोकादायक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Rule : 1 ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम! ATM ते LPG पर्यंत 5 नवे नियम लागू, वाचा सविस्तर

Maharashtra News Live Update: २ तारखेच्या सीजेपीच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा- उद्धव ठाकरे

Car tyre replacement: किती किलोमीटर्सनंतर कारचे टायर बदलले पाहिजेत?

Maharashtra Politics : राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? संजय राऊतांचं मोठं विधान

Railway Ticket: रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! तिकीटासोबत हे ओळखपत्र सोबत ठेवा, नाहीतर भरावा लागेल दंड

SCROLL FOR NEXT