Causes Of Late Menstruation
Causes Of Late Menstruation Saam Tv
लाईफस्टाईल

Causes Of Late Menstruation : मासिक पाळी उशीरा येण्याची कारणं आहाराशी संबंधित आहेत का? जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Menstruation Late : मासिक पाळी प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. दर महिन्यात येणाऱ्या पीरियड्सची तारीख महिलेच्या enstrual cycle वर अवलंबून असते. पण जेव्हा मासिक पाळीचे तारीख चुकते तेव्हा स्त्रियांच्या मनात गर्भधारणेची पहिला विचार येतो.

मासिक पाळी विलंब होण्याचे कारण तणाव (Stress) ,pcod, pcos, त्यासोबतच योग्य आहार (Diet) न घेणे. या सर्व गोष्टी मासिक पाळी उशीरा येण्यासाठी कारणीभूत आहेत. बहुतांश महिला कामामुळे सकाळचा नाश्ता स्कीप करतात. त्यामुळे ही सवय पाळी उशिरा येण्याचे कारण बनू शकते.

त्यासोबतच तुमच्या नकळतपणे आहारात येणाऱ्या चुकीच्या गोष्टी मासिक पाळी उशिरा येण्याचे कारण असते. चला तर मग जाणून आहाराशी संबंधित 5 चुका ज्या सुधारण तुम्ही पीरियड्स रेग्युलर करू शकता.

चुकीचे फूड कॉम्बिनेशन -

चुकीचे फूड कॉम्बिनेशन शरीराद्वारे आवश्यक पोषकतत्वाचे शोषण करण्यास अडथळा आणतात. चुकीच्या फूड कॉम्बिनेशन म्हणजे दुपारच्या जेवणानंतर फळांचे सेवन, चहा आणि स्नॅक्सचे सेवन करणे. त्यामुळे पाळीसाठी आवश्यक पोषकतत्वे मिळत नाही. म्हणून मासिक पाळी नियमित ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थाचे जास्त सेवन -

प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमध्ये कॅलरीज, अनहेल्दी फॅट, अतिरिक्त साखरेचे प्रमाण असल्यामुळे लठ्ठपणा आणि ब्लड शुगर लेव्हल वाढते. जे इंस्ट्रोजेन आणि प्रोजेस्तेरॉनच्या भूमिकेवर परिणाम करू शकतात. हे हार्मोन्स मासिक पाळीचे नियोजन करण्यासाठी आवश्यक आहे.

वेळेवर जेवण न करणे -

अनियमित जीवनशैलीमुळे स्त्रिया अनेकदा त्यांच्या आहाराकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे काही काळानंतर त्यांच्या शरीरात B12, D3 , झिंक या जीवनसत्वाची कमतरता निर्माण होते. जर एखाद्या महिलेला ॲनिमिया असेल तर तिला सुद्धा मासिक पाळी उशिरा येऊ शकते.

पौष्टिकतेच्या कमतरतेकडे दुर्लक्ष -

पौष्टिकतेच्या कमतरता पूर्ण करण्यासाठी स्त्रियांनी संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. काही लोक शरीरातील पौष्टिक आणि जीवनसत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी आहाराऐवजी बाजारात उपलब्ध असलेल्या सप्लीमेंट आणि औषधांवर अवलंबून असतात. मात्र असे करणे आरोग्यला धोकादायक असू शकते. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य आहार घेण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

फळे-भाज्या पुरेशा प्रमाणात न खाणे -

फळे-भाज्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकघटक असतात. तसेच फळे-भाज्यांमध्ये असलेले फायबरचे प्रमाण हार्मोनल समस्यांचा धोका कमी करण्यासाठी मदत करतात.

अनियमित मासिक पाळी सामान्य करण्यासाठी हे घरगुती उपाय करा -

  • आल्याचा लहान तुकडा एक कप पाण्यात उकळून त्यात चवीनुसार मध, मीठ आणि काळी मिरी टाकून महिनाभर दिवसातून तीन वेळा सेवन करा.

  • एक ग्लास दुधात अर्धा चमचा दालचिनी मिक्स करून प्या. अननसाचे नियमित सेवन केल्यानेही अनियमित मासिक पाळीच्या समस्या दूर होतात.

  • उशिरा मासिक पाळी येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला आहे आणि या दरम्यान तुमचे हार्मोन्स बद्दल असतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी तुम्ही व्यायाम आणि काही योग करणे गरजेचे आहे.

  • एक चमचा हळद एक ग्लास दूधात मिक्स करून रात्री झोपण्यापूर्वी नियमितपणे प्यायल्यास अनियमित मासिक पाळीच्या समस्या दूर होतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Forecast: विदर्भासह मराठवाड्यात आजही कोसळणार पाऊस; मुंबईसह ठाण्याला उष्णतेचा 'यलो अलर्ट', वाचा वेदर रिपोर्ट

Patanjali Products: बाबा रामदेव यांना मोठा झटका, पतंजलीच्या १४ प्रकारच्या औषधांवर बंदी; उत्तराखंड सरकारचा निर्णय

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, एप्रिल महिन्याच्या शेवटचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

SCROLL FOR NEXT