Benefits of applying coconut oil on face at night saam tv
लाईफस्टाईल

Skincare Tip: स्किन केअरसाठी सोपा उपाय! दररोज रात्री हे तेल लावल्याने त्वचेला मिळतो नॅचरल ग्लो

Benefits of applying coconut oil on face at night: प्रदूषण आणि तणावामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज होत आहे का? झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर खोबरेल तेल लावल्याने त्वचेला नैसर्गिक चमक, मॉइश्चरायझिंग आणि पोषण मिळू शकते.

Surabhi Jayashree Jagdish

संपूर्ण देशभरात प्रदूषणामुळे लोकं हैराण आहेत. प्रदूषणाचा परिणाम केवळ तुमच्या आरोग्यावर होत नाही तर तुमच्या त्वचेवर देखील होत असतो. प्रदूषण, तणावर आणि धुळीमुळे स्किन केअर नंतरही तुमची त्वचा डल आणि कोरडी होऊ लागते.

त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही विविध प्रोडक्ट्स वापरत असाल. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एका सोप्या उपायाची माहिती देणार आहोत. जर तुम्हाला तुमच्या त्वचेची काळजी घ्यायची असेल तर रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला तेल लावा. चेहऱ्याला तेल लावल्यास ती ह आणि ग्लो जास्त काळ टिकून राहण्यास मदत होते. खोबरेल तेलात अँटीऑक्सिडंट्स, फॅटी अॅसिड आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात जे त्वचेला आतून पोषण देतात.

खोबरेल तेल लावल्याने हे फायदे होतात

मॉइश्चरायझिंग

खोबरेल तेल तुमच्या त्वचेला मॉइश्चरायझ ठेवण्यास मदत करतं. झोपण्यापूर्वी चेहऱ्याला खोबरेल तेल लावा. सकाळी उठल्यावर तुम्हाला हायड्रेटेड वाटणार आहे. खोबरेल तेल लावल्याने कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.

नॅचरल ग्लो

खोबरेल तेल लावल्याने त्वचा मॉइश्चरायझ होते. दररोज रात्री खोबरेल तेल लावल्याने त्वचेला नैसर्गिक चमक येते. जर तुमची त्वचा निस्तेज झाली असेल तर तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता.

पुरळ

तेलात लॉरिक अॅसिडसारखे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. जे तुमचे पिंपल कमी करण्यास मदत करू शकतात. खोबरेल तेलाचा वापर केल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी होऊ शकतात. जर तुम्हाला कोरडी त्वचा असेल तर तुम्ही खोबरेल तेल वापरू शकता.

कसं करावं मालिश

झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा पूर्णपणे धुवा. नंतर तुमच्या तळहातांना खोबरेल तेल लावा. ते तेल तुमच्या चेहऱ्याला हलक्या हाताने लावा. दररोज तेल लावल्याने चेहऱ्यावरील डार्क स्पॉर्ट्स कमी होण्यास मदत होते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Card: एसटी प्रवाशांना दिलासा, NCMC कार्डच्या प्रक्रियेत मोठा बदल

Political News: मोठी बातमी! उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा, वसंत डावखरे प्रकरणात १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसाचा चोख बंदोबस्त

Food For Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात समावेश करा हे ७ पदार्थ; वजन होईल झपाट्याने कमी

Placenta percreta: मूत्राशयापर्यंत पोहोचली होती प्लॅसेंटा; प्रसूतीपूर्वीच धोका ओळखला, डॉक्टरांच्या मेहनतीने गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार

SCROLL FOR NEXT