iPhone चा क्रेझ सध्या तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आपल्यापैकी अनेकांना आयफोन वापरण्याची किंवा तो विकत घेण्याची इच्छा असते. जगभरात या मोबाईलचे सर्वाधिक उत्पादन आहे.
परंतु, आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा आयफोन लवकर खराब होण्याची शक्यता आहे किंवा त्याचा स्फोट होण्याची. याबद्दलची संपूर्ण माहीती अॅपलच्या कंपनीने दिली आहे. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर
जर तुम्ही रात्रभर फोन (Phone) चार्ज करत असाल तर ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. याबद्दलची माहीती अॅपलने आयफोन (iphone) वापरकर्त्यांसाठी इशारा म्हणून दिली आहे. अनेकांना रात्री फोन चार्ज करण्यासाठी सर्वोत्तम वेळ वाटते. बरेचदा आपण फोन चार्जिंगला लावून झोपतो त्यामुळे आग, इलेक्ट्रिक शॉक, दुखापत, iPhone किंवा इतर गोष्टींचे नुकसान होऊ शकते.
जर फोन चार्ज करताना नीट हवा मिळत नसेल तर धोका निर्माण होऊ शकतो. बहुतेक लोक फोन चार्जिंगला लावून उशीजवळ सोडतात. यामुळे ओव्हरहाटिंग होऊ शकते. यामुळे फोनचे नुकसान तर होईलच पण आग लागण्याचीही शक्यता आहे.
2. फोन चार्ज करताना हवा मिळायला हवी
सेफ्टी मेमोमध्ये ऍपलने म्हटले आहे की, 'डिव्हाइस, पॉवर अॅडॉप्टर किंवा वायरलेस चार्जरवर झोपू नका किंवा ते पॉवर स्त्रोताशी जोडलेले असताना ते ब्लँकेट, उशी किंवा तुमच्या शरीराखाली ठेवू नका. तुम्ही तुमचा आयफोन वापरत असताना किंवा चार्ज करत असताना, पॉवर अॅडॉप्टर आणि कोणतेही वायरलेस चार्जर हवेशीर जागेत ठेवा.'
Apple युजर्सला सर्तकतेचा इशारा दिला आहे की, तुम्ही तुमचे डिव्हाइस पॉवर (Power) करण्यासाठी थर्ड-पार्टी चार्जर वापरता तेव्हा आग लागण्याचा धोका वाढू शकतो, कारण काही कमी किमतीचे चार्जर अधिकृत Apple उत्पादनांसारखे सुरक्षित असू शकत नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.