Apple Smartwatch : स्मार्टवॉच हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला आहे. कॉल रिसिव्हपासून ते फिटनेस ट्रॅकिंग आणि नोटिफिकेशनपर्यंत आपल्याला त्याचा उपभोग घेता येतो. परंतु स्मार्टवॉचबद्दल आतापर्यंत अनेकदा अशा काही गोष्टी समोर आल्या आहेत ज्यामध्ये या स्मार्टवॉचने अनेकांच आयुष्य वाचवण्यात यश मिळवलं आहे.
अॅपलवॉचची अशीच एक गोष्ट समोर आली आहे. ज्यामध्ये स्मार्टवॉचमुळे एका मुलाचे प्राण वाचले आहे. या स्मार्टवॉचने भारीच कमाल केली आहे. या स्मार्टवॉचने एका १६ वर्षीय मुलाच्या रक्तामध्ये कमी होणारे ऑक्सीजनचे प्रमाण मोजून कमालचं केली आहे. कमीतकमी वेळात डोके चालवून त्या मुलाचा स्मार्टवॉचमुळे जीव वाचू शकला आहे.
कोलेराडोमधील राहणाऱ्या मार्सेला ह्या न्यूज अँकरने एक गंभीर प्रसंग सांगितला. रिपोर्टच्या अनुसंगे, ही महिला CBS 8 नावाच्या न्यूज चॅनलमध्ये कार्यरत असून एक १६ वर्षीय मुलगा हा स्कायर आहे. मार्सेलाच्या म्हणण्यानुार शुक्रवारच्या सकाळी तिच्या १६ वर्षीय मुलाच्या रक्तामधील ऑक्सिजनचे प्रमाण ढासळल्यामुळे त्याची तब्येत खालावली होती. त्यानंतर मुलाच्या मनगटावर अॅपलवॉच बांधलं आणि त्यानंतर ताबडतोब त्या मुलाच्या रक्तामधील ऑक्सीजनच्या प्रमाणामध्ये सुधरणा जाणवू लागली.
मार्सेलाच्या म्हणण्यानुसार तिच्या मुलाला रात्रीपासूनच कणकण जाणवत होती. असं देखील तिने सांगितले. त्यानंतर मर्सेलाच्या हे लक्षात आलं की, तिच्या मुलाचे ओठ आणि हातापायांची बोटे हलकीशी निळी पडली आहेत. त्यानंतर मार्सेलाने लगेचच स्वतःच्या मनगटावरील अॅपल वॉच काढून मुलाच्या मनगटावर बांधलं आणि पाहते तर काय, तिच्या मुलाच्या रक्तामधील ऑक्सिजन लेवेल कमी होत आहे. हे ६६% च्या आसपास असल्याचं स्मार्टवॉच द्वारे निदर्शनास आलं. लगेचच तिच्या मुलाला मेडिकल ट्रीटमेंट देण्यात आली आणि त्या मुलाचा जीव वाचवण्यात यश प्राप्त झालं.
त्यानंतर मार्सेलाला हे उमगलं की, रक्तामधील ऑक्सिजन लेवल जेव्हा ८८ टक्के कमी होते तेव्हा त्या व्यक्तीला लगेचच मेडिकल सर्व्हिसची गरज असते. या केसमध्ये स्मार्टवॉचने अगदी तंतोतंत आकडे सांगितले. मार्सेला तिच्या मुलाला जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तेव्हा दवाखान्यातील उपकरणांच्या साहाय्याने ऑक्सिजनचे प्रमाण मोजता ६८% एवढे प्रमाण आढळून आले. जर का ,तिच्या मुलाचे ऑक्सिजनचे प्रमाण ६६% राहिले असत तर, तो कोमामध्ये गेला असता असं डॉक्टरांनी सांगितलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.