Apple Scary Fast Event  Saam Tv
लाईफस्टाईल

Apple Scary Fast Event : 22 तासांच्या बॅटरी बॅकअपसह नवा MacBook Pro लॉन्च, काय आहे खासियत आणि किंमत फक्त...

MacBook Pro M3 Launched : Apple ने मंगळवारी नवीन MacBook Pro मॉडेल लाँच केले.

Shraddha Thik

Apple MacBook Pro Launch :

Apple ने मंगळवारी नवीन MacBook Pro मॉडेल लाँच केले. हे सर्व मॉडेल्स M3 सीरीज प्रोसेसरसह येतात. यात लिक्विड रेटिना एक्सडीआर डिस्प्ले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या लॅपटॉपची बॅटरी 22 तासांपर्यंत असेल. Apple ने या इव्हेंटमध्ये तीन नवीन चिपसेट M3, M3 Pro आणि M3 Max लॉन्च (Launch) केले आहेत.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या चिप्स TSMC च्या 3nm प्रक्रियेवर विकसित केल्या गेल्या आहेत. यासोबतच कंपनीने डायनॅमिक कॅशिंग नावाचे नवीन मेमरी फीचर (Feature) लाँच केले आहे. यामुळे तुम्हाला चांगला GPU परफॉर्मन्स मिळेल. नवीन MacBook Pro चे तपशील जाणून घ्या.

MacBook Proची किंमत किती आहे?

नवीन M3 MacBook Pro ची किंमत (Cost) 1,69,900 रुपयांपासून सुरू होते. ही किंमत बेस व्हेरिएंटसाठी आहे, जी 14-इंच स्क्रीन आकारासह येते. तर M3 Pro आणि M3 Max चिपसेटसह व्हेरिएंटची किंमत 1,99,900 रुपयांपासून सुरू होते.

MacBook Pro च्या 16-इंच स्क्रीन आकाराच्या व्हेरिएंटची किंमत 2,49,900 रुपये आहे. सर्व मॉडेल्स सिल्व्हर आणि स्पेस ब्लॅक कलर व्हेरियंटमध्ये येतात. नवीन M3 MacBook Pro मॉडेल 27 देशांमध्ये प्री- ऑर्डरसाठी उपलब्ध असतील. हे 7 नोव्हेंबरपासून विक्रीसाठी सुरू होतील. तुम्ही हे Apple Store किंवा अधिकृत भागीदारांकडून खरेदी करू शकता.

नवीन फीचर्स काय आहेत?

Apple चे नवीन MacBook Pro मॉडेल कंपनीच्या नवीन चिप्ससह येतात - M3, M3 Pro आणि M3 Max.

M3 Max चिपसेट सह व्हेरिएंट 128GB पर्यंत RAM सह येतो. कंपनीच्या कोणत्याही लॅपटॉपमध्ये उपलब्ध असलेली ही सर्वाधिक रॅम आहे.

M3 आणि M3 Pro सह तुम्हाला अनुक्रमे 24GB आणि 36GB RAM मिळेल.

या लॅपटॉपमध्ये 1TB पर्यंत स्टोरेज उपलब्ध आहे. Appleचा दावा आहे की नवीन M3 Pro चिपसेट या आधीचे version M1 Pro पेक्षा 40 पट वेगवान आहे.

तुम्ही 14 इंच आणि 16-इंच स्क्रीन आकारात नवीन MacBook Pro खरेदी करू शकता. या लॅपटॉपमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेली स्क्रीन आहे.

यासोबतच कंपनी बॅकलिट कीबोर्ड देत आहे, जो टच आयडी सह येतो. म्हणजे त्यात बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन उपलब्ध असेल. कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास, हे डिव्हाइस वाय-फाय 6E, ब्लूटूथ 5.3 आणि तीन थंडरबोल्ट 4/ USB 4 पोर्ट, मॅगसेफ 3 चार्जिंग पोर्ट, HDMI पोर्ट आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅकसह येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT