Apple India Diwali sale Saam Tv
लाईफस्टाईल

Apple Festive Sale सुरु; आयफोनपासून मॅकबुकपर्यंत सर्व काही स्वस्त, काय आहेत ऑफर्स?

Satish Kengar

Apple India Diwali sale:

आयफोन प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. अॅपलचा दिवाळी फेस्टिव्ह सेल आजपासून भारतात सुरू झाला आहे. सणासुदीच्या सेलमध्ये iPhones, iPads, Mac डिव्हाइसेस आणि Apple Watch, AirPods यासह इतर Apple उत्पादनांवर बंपर सवलत मिळत आहे.

या सवलती बँक इन्स्टंट डिस्काउंट आणि एक्सचेंजच्या स्वरूपात आहेत. याव्यतिरिक्त Apple निवडक उत्पादनांवर पिकअप आणि फ्री डिलिव्हरी देत आहे. कोणत्या मॉडेलवर किती डिस्काउंट मिळत आहे, याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

Apple Store iPhones मोठी सूट

iPhones वर 6,000 रुपयांपर्यंतची बँक सवलत उपलब्ध आहे. ही बँक ऑफर HDFC बँक क्रेडिट कार्डसाठी वैध आहे. अॅपलच्या अधिकृत वेबसाइटवर स्टोअरमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व iPhones वर बँक ऑफर खालीलप्रमाणे आहे...  (Latest Marathi News)

- iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max वर 6,000 रुपयांची सूट.

- iPhone 15 आणि iPhone 15 Plus वर 5,000 रुपयांची सूट.

- iPhone 14 आणि iPhone 14 Plus वर 4,000 रुपयांची सूट.

- iPhone 13 वर 3,000 रुपयांची सूट.

- iPhone SE वर 2,000 रुपयांची सूट.

याव्यतिरिक्त, 67,800 रुपयांपर्यंत ट्रेड-इन बेनिफिट देखील आहे.

iPads वरही मोठी सूट

- iPad Pro वर 5,000 रुपये सूट (11-इंच, 12.9-इंच).

- iPad Air वर 5,000 रुपये सूट.

- iPad 10th Gen वर 4,000 रुपये सूट.

- iPad 9th Gen वर 3,000 रुपये सूट.

- iPad mini वर 3,000 रुपये सूट.

Mac वर किती आहे सूट?

मॅक उपकरण खरेदी करण्यासाठी HDFC बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. मॉडेलनुसार ऑफर खाली दिले आहे...

- MacBook Air M2 (13-इंच, 15-इंच) वर 10,000 सूट.

- MacBook Pro (13-इंच, 14-इंच, 16-इंच) वर 10,000 सूट.

- मॅक स्टुडिओवर 10,000 रुपये सूट.

- MacBook Air M1 वर 8,000 रुपयांची सूट.

- iMac 24-इंचावर 5,000 रुपयांची सूट.

- मॅक मिनीवर 5,000 रुपये सूट.

Apple Watch ही मिळत आहे सूट

- Apple Watch Ultra 2 वर 5,000 रुपयांची सूट.

- Apple Series 9 वर 4,000 रुपये सूट.

- Apple Watch SE वर 2,000 रुपयांची सूट.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

SCROLL FOR NEXT