APJ Abdul Kalam Death Anniversary Saam tv
लाईफस्टाईल

APJ Abdul Kalam Death Anniversary : अब्दुल कलाम यांचे १० विचार तरुणांसाठी ठरतील प्रेरणादायी

कोमल दामुद्रे

APJ Abdul Kalam Thoughts : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम, ज्यांना मिसाइलमॅन म्हणून ओळखले जाते. आज त्यांची पुण्यतिथी. वयाच्या ८३ व्या वर्षी मेघालयात त्याचे निधन झाले.

१५ ऑक्टोबर १९३१ साली तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम धनुषकोडी या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. त्याचे संपूर्ण नाव अबुल पाकिर जैनुलआब्दीन अब्दुल कलाम. ज्यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम या नावाने ओळखतो. ते भारताचे ११ वे राष्ट्रपती होते.

त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य (Life) देशसेवेसाठी लावले. ते आजही तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचे विचार अनेक तरुणांना कोणत्याही कार्यात यशस्वी (Success) होण्यासाठी प्रेरणा देतात. जाणून घेऊया त्यांचे १० प्रेरणादायी विचार (Thoughts)

1. तरुणांना माझा संदेश आहे की वेगळ्या प्रकारे विचार करा, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा, स्वत:चा मार्ग बनवा, अशक्यप्रायता मिळवा.

2. पहिल्या यशानंतर विश्रांती घेऊ नका कारण दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही अपयशी ठरलात तर सगळे म्हणतील की तुम्हाला पहिले यश नशिबाने मिळाले.

3. जर तुम्हाला तुमच्या मिशनमध्ये यश मिळवायचे असेल तर फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा.

4. जर तुम्ही कोणत्याही प्रयत्नात अयशस्वी झालात तर प्रयत्न करणे थांबवू नका कारण FAIL म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग.

5. यशस्वी होण्याची इच्छाशक्ती मजबूत असेल तर अपयश आपल्याला दबवू शकत नाही.

6. निपुणता ही एक सतत करण्याची प्रक्रिया असते, अपघात नव्हे.

7. स्वप्ने सत्यात येण्यापूर्वी आपल्याला स्वप्ने पाहिले पाहिजेत.

8. स्वप्ने ते नाही जे आपण झोपेत पाहतो, स्वप्ने ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाहीत.

9. आपल्या यशाची व्याख्या जर का भक्कम असेल तर आपण सदैव अपयशाच्या दोन पाऊले पुढे असू.

10. या जगातील सर्वात उत्तुंग यश त्यांनाच मिळालेले आहे, ज्यांना ते यश मिळविण्याची अजिबातच शक्यता नसतांना देखील त्यांनी ते यश मिळविण्यासाठी, त्यांनी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवलेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT