Android XLoader Malware Saam tv
लाईफस्टाईल

Android युजर्स सावधान! एक क्लिक अन् बँक खातं होईल रिकामं, सायबर तज्ज्ञांनी दिला इशारा

Android XLoader Malware : सायबर तज्ज्ञांनी एका नवीन प्रकारच्या मालवेअरबद्दल सांगितले आहे, ज्याचे नाव Android XLoader.

कोमल दामुद्रे

Mobile Phone Hacking :

मोबाईल फोन आपल्याला सर्वांना कडे पाहायला मिळतो. फोनमुळे सर्वसामान्यांपासून अनेकांच्या आयुष्यातील प्रश्न सरार्स सोडवले जात आहे. आपल्या जीवनाचा सगळ्यात महत्त्वपूर्ण हिस्सा फोन बनला आहे. अनेकदा फोनमध्ये नवीन अपडेट येत असतात. तर काहीवेळेस फोन हँग होतो.

भारतात अँड्रॉइड युजर्सची संख्या कोरडोमध्ये आहे. सॅमसंग ते विवोसारख्या स्मार्टफोनमध्ये Android OS सिस्टमचा वापर करुन हँडसेट तयार करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्मार्टफोन (Smartphone) वापरणाऱ्या मोठा धक्का बसू शकतो.

सायबर (Cyber) तज्ज्ञांनी एका नवीन प्रकारच्या मालवेअरबद्दल सांगितले आहे, ज्याचे नाव Android XLoader. हा मालवेअर स्मार्टफोनमधील सगळी माहिती गोळा करतो. आपल्या फोनमध्ये येणाऱ्या SMS द्वारे हा फोन हॅक करतो. याविषयी माहिती ब्लीपिंग कम्प्युटरने McAfee ला दिली आहे.

1. फोन हॅक कसा होतो?

Android XLoader मालवेअर हा आपला फोन सहजपणे हॅक करु शकतो. एसएमएसद्वारे आपल्याला एक URL पाठवली जाते. ज्यामुळे आपल्या फोनमधील सर्व अॅप्सचा डेटा हॅक करण्याचा एक्सेस मिळतो. आलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर फोनमध्ये एपीके फाइल डाउनलोड होते. मेसेज आल्यानंतर हा मालवेअर आपला फोन हॅक (Phone hack) करायला सुरुवात करते.

2. मालवेअर कसे काम करते?

मालवेअर हे साइडलोडिंग अॅपचा वापर करुन दुसऱ्या स्त्रोताकडून फोनमध्ये अॅप इंस्टॉल करते. याबाबत फोन वापरकर्त्यांना माहिती मिळत नाही. हा मालवेअर साइट्स, एसएमएस किंवा अॅप्सच्या द्वारे फोनमध्ये शिरकाव करतो. याचा वापर करुन हॅकर्स तुमचा फोन हॅक करतात.

3. गुगलने केले बॅन

मॅकॅफीनने दिलेल्या माहितीनुसार गुगलने या साइटला बॅन केले आहे. परंतु, हॅकर्स तुमच्यापर्यंत कोणत्याही माध्यामांद्वारे पोहोचू शकतो. त्यासाठी कोणत्याही लिंक्सवर क्लिक करु नका असे सायबर तज्ज्ञांनी सांगितले आहे. गुगल डिव्हाइसला सुरक्षित करण्यासाठी प्ले प्रोटेक्टर सक्षम करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: ऋतुराज गायकवाड मायदेशी परतणार! या खेळाडूला बॅकअप म्हणून थांबवलं; शमीबाबतही घेतला निर्णय

Pune Crime: आधी अपहरण, नंतर निर्घृण हत्या अन् मृतदेहाचे तुकडे; बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येने पुणे हादरले

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

SCROLL FOR NEXT