An easy way to clean the inside of a water bottle Saam Tv
लाईफस्टाईल

पाण्याची बाटली आतून स्वच्छ करण्याचा सोपा मार्ग

Water Bottle Cleaning Tips : बाटल्यांचे तोंड लहान असल्यामुळे त्या आतून जास्त स्वच्छ करता येत नाही अशा परिस्थितीत या बाटल्यांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्या प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या (water bottle) असतात. काहींच्या घरात काचेच्या बाटल्या असतात तर काहींकडे प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्या जातात. हल्ली या बाटल्या मुलं शाळेत किंवा आपण ऑफिसला घेऊन जातो पण या बाटल्या जितक्या बाहेरुन स्वच्छ (Clean) असतात तितक्याच त्या आतूनही स्वच्छ असणे गरजेचे आहे. कारण बाहेरून स्वच्छ दिसणारी बाटली आतून खूप घाण असू शकते. बऱ्याच वेळा आपण बाटल्या स्वच्छ देखील करतो परंतु, बाटल्यांचे तोंड लहान असल्यामुळे त्या आतून जास्त स्वच्छ करता येत नाही अशा परिस्थितीत या बाटल्यांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याचा धोका अधिक प्रमाणात असतो. (An easy way to clean the inside of a water bottle)

हे देखील पहा -

बाटल्या स्वच्छ कशा कराव्यात यासाठी टिप्स (Water Bottle Cleaning Tips)

१. आपण गरम पाण्याच्या साहाय्याने काच आणि प्लास्टिकच्या बाटल्या स्वच्छ करू शकतो, पण यासाठी आपण गरम पाणी थेट बाटलीत टाकू नका. गरम पाणी थेट काचेच्या बाटलीत टाकल्याने ते क्रॅक होऊ शकते आणि प्लॅस्टिकच्या बाटलीत गरम पाणी टाकल्याने ती वितळेल. अशावेळी पाणी गरम करून एका मोठ्या स्टीलच्या भांड्यात काढावे. त्यानंतर या पाण्यात बाटल्या टाका. असे केल्याने त्यातील बॅक्टेरिया देखील मरतील आणि ते स्वच्छ देखील होतील.

२. काचेची किंवा प्लॅस्टिकची बाटली स्वच्छ करण्यासाठी पाण्यात बर्फाचे तुकडे आणि थोडे मीठ घालून लिंबाचे तीन ते चार तुकडे बाटलीत घालून चांगले हलवा. असे केल्यास बाटली पूर्णपणे स्वच्छ होईल आणि बॅक्टेरिया देखील वाढणार नाही.

३. काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बाटल्या स्वच्छ करण्यासाठी आपण व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचाही वापर करू शकता. यासाठी बाटलीमध्ये दोन चमचे व्हिनेगर आणि एक चमचा बेकिंग सोडा मिसळून बाटलीचे झाकण लावा आणि चांगले हलवा आणि थोड्या वेळानंतर बाटली पुन्हा स्वच्छ पाण्याने नीट धुवा. असे केल्याने बाटली पूर्णपणे स्वच्छ होईल. अशाप्रकारे तुम्ही पाण्याची बाटली साफ करू शकता.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गंगापूर धरण ७३ टक्के भरलं, धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग

Accident: बारामतीत अपघाताचा थरार! ट्रकने वडिलांसह दोन चिमुकल्यांना चिरडलं, थरकाप उडवणारा CCTV VIDEO

मुंबई-पुणे-सोलापूर प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर, वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, वाचा सविस्तर

Aishwarya Narkar: पन्नाशीतला हॉटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम

Hair Care : घरच्या घरी बनवा हे हेअर जेल, राठ केस होतील मऊ आणि चमकदार

SCROLL FOR NEXT