Amla Chutney Recipe yandex
लाईफस्टाईल

Amla Chutney : आवळ्याची आंबट गोड चटणी हिवाळ्यात नक्की ट्राय करा; नोट करा सिंपल रेसिपी

Chutney Recipe : आवळा हा शरीरासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्याचे खाण्याचेही अनेक प्रकार आहेत. जसे की, कोणाला आवळा मीठ मसाल्या बरोबर खायला आवडतो.

Saam Tv

आवळा हा शरीरासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्याचे खाण्याचेही अनेक प्रकार आहेत. जसे की, कोणाला आवळा मीठ मसाल्या बरोबर खायला आवडतो. कोणाला आवळा असाच खायला आवडतो, काहींना आवळा कोणत्यातरी भाजीत मिक्स केलेला आवडतो. पण तुम्ही जर आवळा प्रेमी नसाल तर तुमच्यासाठी पुढची रेसिपी खास ठरेल.

आवळ्याच्या रेसिपीचे साहित्य

ताजे आवळे

कोथिंबीर

हिरवी मिरची

लसूण

कांद्याची पात

आलं

पुदिना

कडीपत्ता

धणे

जीरे

मीठ

लिंबाचा रस

आवळ्याची चटणी बनवण्याची सोपी पद्धत

सगळ्यात आधी कढई गॅसवर ठेवून त्यात तेल तापवायला सुरुवात करा. तेल हलकं तापलं तर त्यात मेथीचे दाणे, कढीपत्ता आणि सुक्या लाल मिरच्या, तसेच जिरे यांची फोडणी द्या. फोडणी देताना गॅस एकदम स्लो करून ठेवा. त्याने तुमची फोडणी करपणार नाही. आता आवळे स्वच्छ धुवून त्याचे बारिक तुकडे करून घ्या.

आता चिरलेला आवळा फोडणी घालून छान परता. थोड्या वेळाने त्यात मीठ मिक्स करा. दोन मिनिटांनी गॅस बंद करा आणि फोडणी थंड करून घ्या. मग थंड झालेले मिश्रण मिक्सरमध्ये बारिक करून घ्या. थोडासा गोडवा येण्यासाठी त्यात थोडा गुळ मिक्स करा आणि आंबट आवळ्याची चटणी तयार करा. ही चटणी तुम्ही महिना हवा बंद डब्यामध्ये ठेवून वापरू शकता.

Written By : Sakshi Jadhav

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

SCROLL FOR NEXT