Amazon Launch New Online Payment Saam Tv
लाईफस्टाईल

Amazon Launch New Online Payment : हात दाखवा अन् बिल भरा, Amazon ची हटके सर्व्हिस, कार्डची गरजच नाही!

Amazon Palm Scanning : अॅमेझॉन ग्राहकांसाठी नेहमी नवीन सुविधा घेऊन येत असतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

What Is Palm Scanning Technology : ऑनलाईन शॉपिंगच्या जगात अॅमेझॉनने आपले नाव कमावले आहे. ऑनलाईन शॉपिंगमध्ये अॅमेझॉन ही ग्राहकांची पहिली पसंती आहे. अॅमेझॉन ग्राहकांसाठी नेहमी नवीन सुविधा घेऊन येत असतो. अॅमेझॉनने आता हात दाखवून पेमंट करा ही टेक्नॉलॉजी घेऊन आला आहे.

ऑनलाईन खरेदी करताना ग्राहकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी ऑनलाईन (Online) वेबसाईट नेहमीच काम करत असतात. अॅमेझॉनने ग्राहकांसाठी आता एक नवीन सेवा सुरु केली आहे. ग्राहकांना पेमेंट करताना सोपे जावे यासाठी अॅमेझॉन 'वन पाम पेमेंट' ही सुविधा सुरू केली आहे.

वन पाम पेमेंट ही सुविधा बाजारात येण्यासाठी अजून खूप वेळ आहे. परंतु कंपनीचे म्हणणे आहे की, या वर्षाच्या अखेरीस ते देशभरातील सर्व खाद्यपदार्थांच्या दुकानात ही सुविधा पोहचवतील. आता काही खाद्यापदार्थांच्या दुकानात ही सुविधा सुरू झाली आहे.

हे तंत्रज्ञान कसे काम करेल

अॅमेझॉनच्या म्हणण्यानुसार, या तंत्रज्ञानामध्ये कॅमेऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. ज्यामुळे ते हाताच्या तळव्याला योग्यरित्या कॅप्चर करता येईल. कॅमेरे तळहाताच्या रेषा आणि कडा स्कॅन करतील.

यासोबतच, कॅमेरे (Camera) तुमच्या हाताच्या नसांच्या प्रतिमा स्कॅन करतील आणि त्यांना ताबडतोब एनक्रिप्टेड स्वरूपात रूपांतरित करतील. यानंतर, हे फोटो Amazon One साठी खास डिझाइन केलेल्या क्लाउड सर्व्हरवर जपण्यात येतील.

सोप्या भाषेत सांगायचे तर, बोटांच्या ठशांप्रमाणे प्रत्येकाच्या हातावरील रेषाही वेगळ्या असतात. यामुळे, त्याचे क्लोनिंग करणे सोपे नाही. अशावेळी कॅमेरा आणि स्कॅनरच्या मदतीने तळहाता स्कॅन करता येतो. अॅमेझॉन नवीन सेवेत याचा वापर करेल.

अशा प्रकारे नोंदणी करा

तुम्ही Amazon चे प्राइम मेंबर असाल आणि Amazon One Payment वापरत असाल तर तुम्हाला त्यासोबत जोरदार सूट देखील मिळेल. नवीन Amazon One पेमेंटसाठी, तुम्हाला Amazon One किओस्कवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणीसाठी तुम्हाला तुमचे डेबिट कार्ड टर्मिनलवर ठेवावे लागेल. वाचकाला पाम वेब करावे लागेल. त्यानंतर फोन नंबरची (Phone Number) नोंदणी करावी लागेल आणि त्यानंतर प्रक्रिया पूर्ण होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुण्यातल्या नवले ब्रिजवर दोन चारचाकी वाहनांचा अपघात; ३ जण गंभीर जखमी

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

SCROLL FOR NEXT