Lemon Peels
Lemon Peels  Saam Tv
लाईफस्टाईल

Lemon Peels Benefits : लिंबाच्या फळासोबतच सालीचे देखील आरोग्याला अनोखे फायदे !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Lemon Peels : लिंबाप्रमाणेच लिंबाची सालही अत्यंत फायदेशीर असते. तर मग आता लिंबाची साल फेकून देण्याची चूक करू नका. तर ती अशी उपयोगात आणा.

१. लिंबाच्या सालीत व्हिटॉमिन ए, सी, पोटॅशियम, कॅल्शियम, फायबर यांसारखे अनेक पोषकघटक असतात. मेडिकल एक्सपर्ट्सनुसार लिंबाची सालही लिंबू पाण्यापेक्षा अधिक उपयुक्त असते.

२. लिंबाच्या सालीत कॅल्शियम आणि व्हिटॉमिन सी भरपूर असल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.

३. लिंबाच्या सालीच्या वापरामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यात असलेल्या अँटी ऑक्सीडेंटमुळे स्किन कॅन्सरला (Cancer) प्रतिबंध होण्यास मदत होते.

४. व्हिटॉमिन सी आपल्या त्वचेसाठी अत्यंत गरजेचे आहे. लिंबाच्या सालीत ते भरपूर प्रमाणात असते. याच्या वापरामुळे त्वचेचा कॅन्सर, हृदयाचे आजार (Disease) दूर होण्यास मदत होते.

५. लिंबाच्या सालीत असलेल्या मिनरल्समुळे पचनक्रिया सुधारते. त्यामुळे आपले पचन अधिक चांगल्या प्रकारे होते आणि परिणामी अनेक आजारांपासून सुटका मिळते.

६. तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीवर लिंबाची साल फायदेशीर ठरते.

७. लिंबाच्या सालीमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. जर तुमचे रक्तदाब नियंत्रित असेल तर हृदयासंबंधिच्या समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होते.

८. बदलत्या काळानुसार आपली जीवनशैलीही अत्यंत बदलली आहे. अधिकतर लोक मधुमेहाने त्रस्त आहेत. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी लिंबाची साल उपयुक्त ठरते.

९. महत्त्वाचे म्हणजे ताण दूर करण्यास लिंबाच्या सालीची मदत होते. यात काही प्रमाणात फ्लेवानॉयड असते. त्यामुळे आपला ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेस दूर होतो.

१०. लिंबाच्या सेवनाने लिव्हर साफ होण्यास मदत होते. रक्ताभिसण चांगले होते.

लिंबाच्या रसाइतकीच लिंबाची साल देखील गुणकारी आहेत.

पदार्थांची चव वाढवण्यासाठी जेवणात हमखास लिंबाचा वापर होतो. हे संत्री आणि मोसंबी प्रमाणे एक साइट्रस फळ आहे. नेहमी आपण लिंबाचा रस वापरतो आणि त्याची साल ही फेकुन देतो. मात्र, लिंबाच्या रसा इतकीच लिंबाची साल देखील गुणकारी आहेत.

लिंबात बायोएक्टिव्हचे प्रमाण जास्त असते, जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. लिंबाच्या सालीत फायबर आणि क जीवनसत्त मोठ्या प्रमाणात असते. एवढंच नाही तर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील मोठ्या प्रमाणात असतात. एवढे जीवसत्व आहेत.

लिंबाच्या सालीचे अन्य फायदे -

१. लिंबाच्या सालीचे सेवन केल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. संशोधना नुसार आपण जर रोज एक ते दोन ग्रॅम क जीवनसत्त्वाचे सेवन केले तर आपल्याला व्हायरल ताप आणि सर्दी होण्याची शक्यता ही ८ ट्क्क्यांन कमी होते.

२. अनेकदा जेवण्याच्या भांड्याला आतून चिवटपणा राहतो. साबणाने देखील हा चिवटपण जात नाही. एखादा पदार्थ करपला की भांड्याच्या तळाला डाग राहतात अशावेळी लिंबाच्या सालीने भांडी घासली की चिवटपणा लगेच निघून जातो.

३. कुकरमध्ये भात शिजवताना कुकर आतून काळा पडतो अशावेळी खाली पाण्यासोबत लिंबाची एक साल देखील ठेवावी, सालीमुळे कुकर आतून काळा होत नाही.

४. चहा किंवा कॉफी तयार करताना भांड्यावर येणार काळा थर काढण्यासाठी लिंबाच्या सालीचा वापर होऊ शकतो.

५. फ्रिजमध्ये जर दुर्गंध येत असेल तर दोन तीन लिंबाच्या साली ठेवाव्या, फ्रिजेमधी दुर्गंधी लगेच दूर होते.

६. घरात मुंग्या येत असतील तर त्या जिथून येतात तिथे लिंबाची साल ठेवावी, मुंग्या किंवा इतर छोट्या कीटकांचा त्रास कमी होतो

७. लिंबांच्या सालीचा वापर करून तुम्ही नखं स्वच्छ करू शकता. लिंबाची साल पाय किंवा हातांच्या बोटावर अलगद फिरवल्यास नखं तर स्वच्छ होतातच पण नखांवर एक वेगळीच चमक देखील येते.

८. ढोपर किंवा हाताचे कोपरे काळवंडले असतील तर त्या ठिकाणी लिंबाच्या सालीने मसाज केल्याच काळवंडलेली त्वचा उजळते.

Edited By : Shraddha Thik

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महायुतीचं टेन्शन वाढलं; शांतिगिरी महाराजांच्या भूमिकेने नाशिकचं राजकारण तापलं

Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर लोकसभेत महिला, दिव्यांग आणि युवा अधिकारी कर्मचारी सांभाळणार ३७ मतदान केंद्र

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट, ठाकरे गटाच्या आणखी एका उमेदवाराने भरला अर्ज; दरेकरांचं काय?

Today's Marathi News Live : प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवणूक, खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक

Nashik-Mumbai Highway : नाशिक मुंबई महामार्गावर दुचाकीला धडक दिल्यानंतर बलगरने घेतला पेट; केबीनमध्ये अडकून चालकाचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT