चेहऱ्याच्या सौंदर्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग हे केस असतात. त्याच्या स्टाइल करण्यावरुन आपण अधिकचं सुंदर दिसतो. केसांना सिल्की आणि शायनी बनवण्यासाठी आपण अनेक घरगुती पदार्थांचा वापर करतो. त्यातील एक कोरफड जेल.
सिल्की आणि शायनी केसांसाठी अनेकदा टाळूवर कोरफड जेलचा वापर केला जातो. धूळ आणि पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे केस तुटतात आणि गळतात ज्यामुळे त्याच्या केसांची चमक देखील कमी होते. त्यामुळे कोरफडचा वापर करणे देखील आपल्या केसांसाठी हानिकारक असू शकते. केसांवर जास्त प्रमाणात कोरफड जेल लावल्यास काय परिणाम होतात हे जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
1. खाज सुटण्याची समस्या
कोरफड जेलचा केसांवर अधिक प्रमाणात वापर केल्यास डोक्याला खाज सुटणे आणि जळजळ होऊ शकते. तसेच केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
2. टाळू खराब होणे
कोरफड जेलचा वापर केल्याने टाळूवर कोंडांचा थर तयार होतो. जो लवकर निघत नाही. बरेचदा याकडे दुर्लक्ष केल्यास ती वाढतच जाते. त्यामुळे टाळू खराब होते.
3. सर्दी आणि खोकला
थंडीच्या (Winter Season) दिवसात कोरफडचा वापर केल्याने सर्दी, खोकल्याच्या समस्येला सामोरे जावे लागेत. जेल हे थंड असल्यामुळे त्याचा आपल्या आरोग्यावर (Health) परिणाम होतो.
4. तेलकट केस
कोरफड जेल त्वचेसाठी फायदेशीर असते. तसेच केसांना चमकदार आणि मुलायम बनवते. परंतु, याच्या अतिवापरामुळे केस तेलकट होतात. ज्या लोकांचे केस (Hair) तेलकट होतात त्यांनी कोरफड जेल लावणे टाळावे.
5. मुरुम
बरेचदा कोरफड जेलचा अतिवापर केल्यास टाळूचे नुकसान होते. तसेच डोक्यावर फोड येऊ लागतात. ज्यामुळे त्रास होतो. त्यासाठी केसांना आठवड्यातून १ ते २ वेळा कोरफड जेल वापरा.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.