Baby Care  Saam TV
लाईफस्टाईल

Baby Care : लहान मुलं कधीच आजारी पडणार नाहीत; फक्त आहारात करा या गोष्टींचा समावेश

Almond Date Paste for Baby :लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढावी यासाठी त्यांच्या आहारात काही महत्वाच्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे. त्यामुळे आज त्याचीच माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

लहान मुलं फार नाजूक असतात. ती काही ना काही कारणाने आजारी पडतात. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता फार कमी असते. त्यामुळे त्यांना वारंवार सर्दी, खोकला, ताप येणे अशा समस्या जाणवतात. लहान मुलांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढावी यासाठी त्यांच्या आहारात काही महत्वाच्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे. त्यामुळे आज त्याचीच माहिती जाणून घेणार आहोत.

बदाम आणि खजूर

लहान मुलं नाजूक असतात. त्यांची हाडे देखील नाजूक असतात. त्यांना मजबूत करण्यासाठी त्यांच्या आहारात काही महत्त्वाच्या गोष्टी असणे गरजेचे आहे. त्यामुळे आजपासूनच तुम्ही लहान मुलांना बदाम आणि खाजून खाण्यासाठी द्या. लहान मुलांना तर दात देखील नसतात, मग ते असे कडक ड्रायफ्रुट कसे खाणार असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल.

लहान मुलांना ड्रायफ्रुटची म्हणजे खजूर आणि बदामची पेस्ट तुम्ही खाण्यासाठी देऊ शकता. आता ही पेस्ट कशी बनवावी याची माहिती जाणून घेऊ.

सर्वात आधी 5 बदाम आणि 5 ओली खजूर घ्या. त्यानंतर खजूर आणि बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर मिक्सरला तुम्ही याची मस्त पेस्ट बनवू शकता. पेस्ट बनवणे अगदी सोपे आहे. तुम्ही पण्या ऐवजी दुधाचा वापर सुद्धा करू शकता. याने मुलांची बुद्धी तल्लख होते. दुधात बनवलेली ही पेस्ट गॅसवर शिवजून घ्या.

लक्षात ठेवा की लहान मुलांना अन्न लगेच पचत नाही. त्यामुळे त्यांना कच्ची पेस्ट खाण्यासाठी देऊ नका. पेस्ट थोडी शिजवून घेतली की मग त्यांना खाण्यासाठी द्या. याने मुलांची हाडे मजबूत होतात. त्यांची रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढते. मुलांना सहज कोणताही आजार होत नाही.

लहान मुलांचा आहारात जास्त साखर नसावी. त्यामुळे तुम्ही त्यांना खजूरपासून बनलेली ही पेस्ट देऊ शकता. तसेच तुमची मुलं थोडी मोठी असतील आणि सतत चॉकलेट खाण्याचा हट्ट करत असतील तर त्यांना देखील चॉकलेट न देता खजूर आणि ड्रायफ्रूटपासून बनलेले पदार्थ खाण्यासाठी द्या. असे केल्याने मुलांची बुद्धी वाढते. तसेच त्यांना भविष्यात दातांच्या देखील कोणत्याही समस्या होत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT