RAM 1500 REV Saam TV
लाईफस्टाईल

RAM 1500 REV: एका चार्जमध्ये धावणार तब्बल 800 किमी, मिळणार ऑल व्हील ड्राइव्हची मजा! येत आहे नवीन इलेक्ट्रिक पिकअप ट्रक

Upcoming Electric Vehicles : एका चार्जमध्ये धावणार तब्बल 800 किमी, येत आहे नवीन इलेक्ट्रिक पिकअप ट्रक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

RAM 1500 REV Electric Pick-Up Truck : जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांचा हा कल पाहता वाहन उत्पादक जवळपास प्रत्येक सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक वाहन आणण्याची तयारी करत आहेत.

यातच आघाडीची वाहन उत्पादक कंपनी स्टेलांटिस एन.व्हीने (स्टेलांटिस) आपला नवीन इलेक्ट्रिक पिकअप ट्रक RAM 1500 REV सादर करणार आहे. हा ट्रक दिसायला खूपच आकर्षक आणि दमदार आहे. यामध्ये कंपनीने लेटेस्ट ऑल व्हील ड्राइव्ह (4x4) फीचर दिले आहे. हा ट्रक जरी कंपनीने सादर केला असला तरी ग्राहकांपर्यत तो 2025 मध्ये पोहोचणार आहे. (Latest Marathi News)

कसा आहे RAM 1500 REV पिकअप ट्रक

RAM ही हा विशिष्ट पिकअप ट्रकिंग स्टाईलसाठी जगभरात ओळखला जातो. हा ट्रक ऑफरोडिंग वाहन तसेच जड पेलोड वाहून नेण्यासाठी बेस्ट आहे. याच्या इलेक्ट्रिक व्हर्जनकडूनही ग्राहकांना याच अपेक्षा आहेत. क्रिस्लरची मूळ कंपनी स्टेलांटिस NV ने आपला नवीन इलेक्ट्रिक रॅम पिकअप ट्रक अॅडव्हान्स फीचर्स आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. कंपनी आगामी न्यूयॉर्क मोटर शोमध्येही हा सादर करणार आहे.

बॅटरी पॅक आणि ड्रायव्हिंग रेंज

कंपनीने दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह RAM 1500 REV लॉन्च करणार आहे. हा लहान आणि मोठ्या बॅटरी पॅकसह येईल. याच्या शॉर्ट रेंज मॉडेलमध्ये कंपनीने 168.0-kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, हा प्रकार एका चार्जमध्ये 350 मैल म्हणजेच 563 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देतो. दुसरीकडे लाँग रेंज व्हर्जनमध्ये कंपनीने 229.0-kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे, जो एका चार्जमध्ये 500 मैल किंवा 804 किलोमीटरचा प्रवास करण्यास सक्षम आहे.

या इलेक्ट्रिक ट्र्कसाठी (EV) डिझाइन केलेल्या नवीन बॉडी-ऑन-फ्रेम आर्किटेक्चरवर तयार केला जाईल. कंपनीचा दावा आहे की, हा इलेक्ट्रिक पिक-अप ट्रक 14,000 एलबीएस किंवा 6,350 किलो वजन वाहून नेऊ शकतो आणि 1,224 किलो वजन उचलण्यास सक्षम आहे. पिकअपची बॅटरी ड्युअल 335-एचपी इलेक्ट्रिक ड्राईव्ह मॉड्यूल उर्जा देते. मागील एक्सलला इलेक्ट्रॉनिक लॉकिंग रिअर डिफरेंशियल मिळते. तर फ्रंट एक्सलला ऑटोमॅटिक व्हील-एंड डिस्कनेक्ट सिस्टम मिळते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT