Air Pollution Side Effects Saam Tv
लाईफस्टाईल

Air Pollution Side Effects : वाढत्या प्रदूषणाचा फुफ्फुसावर होतोय परिणाम, डाएटमध्ये आजच सामील करा हे ड्रिंक्स

Pollution Side Effects : श्वास घेण्यात त्रास होणे, डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

कोमल दामुद्रे

How To Clean Your Lungs :

वाढत्या प्रदूषणाचा आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे. त्यामुळे श्वास घेण्यात त्रास होणे, डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम हा फुफ्फुसावर होताना दिसून आला. त्यामुळे फुफ्फुसांमध्ये घाण साचू लागते आणि त्यामुळे शरीरात अनेक आजार पसरतात. फुफ्फुस स्वच्छ करण्यासाठी आहारात आरोग्यदायी पेयांचा समावेश करु शकता. या ड्रिंक्सचा डाएटमध्ये समावेश केल्यास फायदा होईल.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. मुळेथी चहा

मुळेथी शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. सर्दी खोकल्यासाठी हे बहुगुणी समजली जाते. मुळेथीचा चहा प्यायल्याने फुफ्फुसाच्या समस्या दूर होतात. याशिवाय हृदयविकाराचा (Heart Attack) धोका कमी होतो.

2. मध आणि गरम पाणी

कोमट पाण्यात नियमितपणे मध घालून प्यायल्याने फुफ्फुसातील घाण निघून जाण्यास मदत होते. हे पेय दाहक- विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे, जे फुफ्फुसांना (Lungs) निरोगी ठेवण्यास मदत करते.

3. ग्रीन टी

अँटिऑक्सिडंट गुणधर्माने समृद्ध असलेला ग्रीन टी (Tea) फुफ्फुसांसाठी खूप फायदेशीर आहे. वाढत्या प्रदूषणाचा सामना करण्यासाठी फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी ग्रीन टीची मदत होऊ शकते. यामुळे फुफ्फुसातील सूज कमी होण्यास मदत होते.

4. पुदिना चहा

पुदिन्याच्या चहामध्ये डिटॉक्सिफायिंग गुणधर्म आढळतात. जे फुफ्फुसांना स्वच्छ करते. हा चहा फुफ्फुसांना प्रदूषणापासून वाचवतो. तसेच पुदिन्याचा चहा प्यायल्याने चयापचाय वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT