Air Pollution Affects Eye Saam TV
लाईफस्टाईल

Air Pollution Affects Eye : वाढत्या प्रदूषणामुळे डोळे लाल होणे, सतत खाज सुटते; कशी घ्याल डोळ्यांची काळजी?

Air Pollution Side Effects : वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांना श्वसनाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

कोमल दामुद्रे

Eye Care Tips :

बदलत्या वातावरणाचा आपल्या आरोग्यावर अधिक प्रमाणात परिणाम होताना दिसून येत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांना श्वसनाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परंतु, श्वसनासोबत डोळ्यांच्या समस्यांमध्ये देखील अधिक प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे.

हवेची गुणवत्ता घसरल्यामुळे वातावरणातील हवा अधिक जीवघेणी ठरत आहे. विषारी हवेमुळे फुफ्फुसे आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत आहे, पण वाढत्या प्रदूषणामुळे डोळे लाल होणे, जळजळणे आणि खाज येण्याच्या समस्या देखील निर्माण होत आहे. जर तुम्हाला देखील या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर या गोष्टींनी डोळ्यांचे आरोग्य राखा. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. घरातून बाहेर पडताना चश्मा घाला

घराबाहेर (Home) पडताना सनग्लासेस घाला. प्रदूषणामुळे स्वत:चे संरक्षण होण्यास मदत होईल. सनग्लासेस घातल्याने प्रदूषणाच्या कणांपासून डोळ्यांचे रक्षण करता येईल.

2. घराच्या घरी व्यायाम करा

मॉर्निग वॉक (Morning Walk) करण्यासाठी घराबाहेर पडत असाल तर सकाळच्या दाट धुक्यांमुळे डोळ्यांना ऍलर्जी होण्याची शक्यता अधिक वाढते. त्यामुळे घरच्या घरी व्यायाम करा.

3. पाण्याने डोळे धुवा

बाहेरुन घरी आल्यानंतर पाण्याने डोळे (Eye) धुवा. ज्यामुळे डोळ्यांची जळजळ आणि खाज सुटण्यापासून वाचवण्याचा प्रभावी मार्ग आहे. प्रदूषणामुळे डोळ्यांमध्ये साचलेली धूळ आणि घाण यामुळे डोळे लाल होतात. तसेच थंड पाण्याने डोळे धुतल्यास कण प्रदूषणाचे निघून जाण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT