लाईफस्टाईल

Air Pollution: वाढत्या प्रदूषणामुळे होऊ शकतो डोळ्यांना त्रास; अशा प्रकारे घ्या काळजी

Air Pollution Tips: वायु प्रदूषणामुळे लोकांना खूप प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Air Pollution Side Effects :

दिवसेंदिवस वातावरणात बदल होताना दिसत आहे. वातावरण बदलामुळे वायूप्रदूषणाचा धोका वाढत आहे. वायुप्रदूषणामुळे लोकांना खूप प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक आजार उद्भवताना दिसत आहे. मात्र, वायूप्रदूषणामुळे श्वसनाच्या आणि डोळ्याचे आजार जास्त प्रमाणात वाढत आहेत.

वायू प्रदूषणामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होत आहे. वाढत्या वायूप्रदूषणामुळे अनेक लोकांना श्वसनाचा, त्वचेचा त्रास होत आहे. तर अनेकांना डोळ्यांच्या समस्या होत आहेत. प्रदूषणामुळे अनेक लोक ग्लूकोमा या आजाराला बळी पडत आहेत.

ग्लूकोमा हा डोळ्यांचा आजार आहे. या आजाराने डोळ्यांची दृष्टी कमी होते. यामुळे डोळ्यांत पाणी येणे, धुसर दिसणे अशा समस्या होतात. त्यामुळे नंतर दिसायला कमी होते. त्यामुळे हा आजार होऊ नये यासाठी कोणते उपाय करावेत याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

ग्लूकोमाची लक्षणे

जे लोक जास्त प्रमाणात बाहेर फिरतात. त्यांना प्रदूषणाचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो. यामुळे डोळ्यात जळजळ, पाणी येणे आणि कमी दिसणे अशा समस्या होतात. यामुळे ग्लूकोमाचा धोका वाढतो. त्यामुळे डोळ्यांची विशेष काळजी घ्यायला हवी.

प्रदुषणापासून डोळ्यांची काळजी घ्या

घराबाहेर जाताना चष्मा घाला.

डोळ्यांना सारखा स्पर्श करु नये.

जळजळ झाल्यास पाण्याने स्वच्छ डोळे धुवून घ्या.

डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, डोळ्यात ड्रॉप टाका.

घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनसेचा जाहीरनामा येणार

Candidate List Party wise : निवडणूकीच्या रिंगणात किती पक्षांचे उमेदवार, शिवसेना-ठाकरे कोणत्या क्रमांकावर? अशी आहे संपूर्ण यादी

TMKOC Fame Jheel Mehta: कोण आहे भिडेंचा जावई? 'तारक मेहता' फेम सोनू लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारीखही ठरली

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सिरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; प्रॅक्टिसदरम्यान 'या' फलंदाजाच्या हाताला दुखापत

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT