Air Pollution Affect Lung Cancer  Saam Tv
लाईफस्टाईल

Air Pollution Affect Lung Cancer : फुफ्फुसाचा कर्करोग असणाऱ्यांना वाढत्या प्रदूषणाचा धोका! कशी घ्याल काळजी?

Air Pollution Effects Health : वायूप्रदूषणामुळे श्वासोच्छवासासंबंधी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Lung Cancer Effected By Air Pollution :

फुफ्फुसाचा कर्करोग हा जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. देशभरात वायू प्रदूषणाच्या पातळीत चिंताजनक वाढ झाल्याने, फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांना त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. याकरिता विशेष सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

वायू प्रदूषणामुळे श्वासोच्छवासासंबंधी अडचणींचा सामना करावा लागू शकतो आणि आधीच फुफ्फुसाच्या कर्करोगाशी लढा देत असलेल्या रुग्णासाठी गुंतागुंत वाढू शकते. हवेतील हानिकारक प्रदूषक, जसे की सूक्ष्म कण आणि नायट्रोजन डायऑक्साइड, फुफ्फुसांवर विपरीत परिणाम करतात तसेच फुफ्फुसांचा दाह वाढवू शकतात. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सातारा आणि पुण्यातील मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचे डॉ. रविकुमार वाटेगावकर म्हणतात, ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी होते अशा सर्व रुग्णांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाची दाट शक्यता असतो. वायू प्रदूषणामुळे (Air Pollution) फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या (Cancer) रुग्णांसाठी उपचार परिणामांवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो.

विविध अभ्यासातून असे दिसून आले आहे की प्रदूषित भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये प्रदूषण विरहीत वातावरणात राहणाऱ्या नागरिकांपेक्षा जास्त प्रमाणात फुफ्फुस विकाराची समस्या असते. फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांना संभाव्य धोक्यांची जाणीव असणे आणि प्रतिबंधात्मक उपयांनी अवलंबविणे महत्वाचे आहे.

1. फुफ्फुसाचा कर्करोग असणाऱ्या रुग्णांनी आरोग्याची कशी काळजी घ्यावी

1. फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांनी प्रदूषण कालावधीत विशेषत: पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी घरात राहणे गरजेचे आहे. या काळात, वातारणातील प्रदूषकांचे प्रमाण अधिक असते.

2. वाचन, संगीत ऐकणे किंवा विश्रांती तंत्राचा सराव यासारखे छंद जोपासणे गरजेचे आहे. जर तुम्हाला बाहेर पडायचे असेल तर न चुकता मास्कचा वापर करावा. याव्यतिरिक्त,घरामध्ये HEPA फिल्टरचा (High-Efficiency Particulate Air) समावेश असलेल्या एअर प्युरिफायर वापर करावा जेणेकरुन हवेतील हानिकारक कण काढून शुध्द हवा मिळवण्यास मदत होईल.

3. फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांसाठी वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे घरातील हवेची चांगली गुणवत्ता सुनिश्चित करणे. यामध्ये हीटिंग आणि कूलिंग सिस्टमची नियमित देखभाल करणे आणि उच्च-प्रदूषण काळात घरातील खिडक्या बंद ठेवणेही गरजेचे आहे.

4. संतुलित आहाराचे सेवन करुन निरोगी जीवनशैली राखून आणि शारीरिकरित्या सक्रिय राहिल्यावर संपूर्ण आरोग्यावर (Health) सकारात्मक परिणाम दिसून येतात आणि वायू प्रदूषणासारख्या पर्यावरणीय संकटाशी लढण्याची क्षमता प्राप्त होते.

5. हिवाळ्यात श्वसनाच्या समस्या वाढण्याची दाट शक्यता आहे कारण या दिवसात तापमान झपाट्याने कमी होते, तेव्हा वायुमार्ग किंचित संकुचित होतात, ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते. थंड आणि कोरडी हवा केवळ आजारी फुफ्फुसांनाच नव्हे तर निरोगी फुफ्फुसांना देखील हानी पोहोचवते.

6. हिवाळ्यात धुरके (धुर + धुके) मुळे प्रदूषणाची पातळी अधिक असते. अशा परिस्थितीत मास्कचा वापर करा तसेच तापमान खूप कमी असेल तेव्हा उघड्यावर व्यायाम करणे टाळा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT