Air Pollution Effects On Skin Saam Tv
लाईफस्टाईल

Air Pollution Effects On Skin : प्रदूषण करतंय तुम्हाला कमी वयात म्हातारं, कशी घ्याल त्वचेची काळजी

Air Pollution Effects : वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्यासोबत त्वचेचे आणि केसांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.

कोमल दामुद्रे

Skin Effected By Air Pollution :

मुंबई, पुणे, नाशिक, दिल्लीसह भारतातील अनेक राज्यात प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. राज्यभरात सध्या दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. फटाक्यांचा मोठा परिणाम शहरातील प्रदूषणावर होताना दिसून येत आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्यासोबत त्वचेचे आणि केसांचे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे त्वचेवर हानिकारक परिणाम होताना दिसून येत आहे. त्वचा काळी पडणे, त्वचेवर रॅशेस येणे, त्वचा जळजळणे यांसारख्या इतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हवेची गुणवत्ता खालवल्यामुळे वाढत्या प्रदूषणाचा (Pollution) परिणाम अधिक प्रमाणात त्वचेचवर दिसून आला आहे. प्रदूषणामुळे त्वचेचे (Skin) नुकसान आतून होते आहे. जाणून घेऊया त्वचेला अजून कोणत्या प्रकारे नुकसान होते आहे.

प्रदूषणामुळे अनेक आजारांना (Disease) बळी पडावे लागते आहे. यामुळे शरीराच्या अनेक भागावर परिणाम होताना दिसून आला.

जेव्हा प्रदूषण वाढते तेव्हा त्वचेला दोन प्रकारचे नुकसान होते. त्वचेची आर्द्रता नष्ट होते. तसेच त्वचेची कोलेजन आणि नैसर्गिक लवचिकता कमी होते. यामुळे त्वचा लवकर खराब होते.

तसेच वाढत्या वयाबरोबर त्वचेचा पोत खराब होतो आणि ती कोरडी पडू लागते. यामुळे त्वचारोग, सोरायसिस आणि एक्जिमाच्या आजारात अतिप्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे.

1. त्वचेची काळजी कशी घ्याल?

  • अतिप्रमाणात धुम्रपान आणि प्रदूषणामुळे त्वचा लवकर वृद्ध होते. त्वचा अधिक रुक्ष होते.

  • घराबाहेर पडताना त्वचेला सनस्क्रिन लावा. ज्यामुळे त्वचेचे नुकसान बऱ्याच प्रकारे कमी होते.

  • सनस्क्रिन व्यतिरिक्त व्हिटॅमिन सी आणि ई असलेली त्वचेची उत्पादने देखील वापरा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Numerology: या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती असतात लकी; प्रेमात अन् करिअरमध्ये मिळते यश

Maharashtra News Live Updates: तासगावमध्ये शरद पवारांची सभा, अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेणार का?

Gold Price Today: 5000 हजारांनी स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव वाढले; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Devendra Fadanvis : मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान, पाहा Video

Ladki Bahin Yojana : ... तर याला मी लाच म्हणेल, लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT