Air India Offer Saam Tv
लाईफस्टाईल

Air India ची 'Time To Travel' ऑफर! वर्षभरासाठी १,७९९ रुपयात विमानाने करता येणार प्रवास, बुकिंग कसे कराल?

Air India Offer : जर तुम्हाला बजेटमध्ये फिरायचे असेल तर एअर इंडियाने तुमच्यासाठी जबरदस्त ऑफर आणली आहे.एअर इंडियाने ग्राहकांसाठी टाईम टू ट्रॅव्हल सेल जाहीर केला आहे.

कोमल दामुद्रे

Time To Travel Offer :

अनेकांचे स्वप्न असते की, आयुष्यात एकदा तरी विमानाने प्रवास करावा. हल्ली प्रत्येकजण सुट्टी एन्जॉय करण्यासाठी कुठे ना कुठे तरी जात असतोच. जर तुम्हाला बजेटमध्ये फिरायचे असेल तर एअर इंडियाने तुमच्यासाठी जबरदस्त ऑफर आणली आहे.

एअर इंडियाने (Air India) ग्राहकांसाठी टाईम टू ट्रॅव्हल सेल जाहीर केला आहे. यामध्ये तुम्ही स्वस्त दरात फ्लाइटचे तिकीट बुक करु शकता. यामध्ये तुम्हाला फक्त १७९९ रुपयांमध्ये फ्लाइटचे तिकीट बुक करता येईल. बुकिंग (Booking) केल्यानंतर तुम्ही ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत त्याचा वापर करु शकता. ही ऑफर ११ जानेवारी, २०२४ ते ११ जानेवारी, २०२५ दरम्यान बुक केलेल्या तिकिटांवर उपलब्ध आहे. ही ऑफर (Offer) प्रवाशांना वर्षभरासाठी मिळत आहे.

1. फ्लाइट तिकीट कसे बुक कराल?

ही ऑफर तुम्हाला काहीच ठिकांणांसाठी मिळत आहे. या ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही बंगळुरु-चेन्नई, दिल्ली-जयपूर, बंगळुरु - कोची, दिल्ली-ग्वाल्हेर आणि कोलकाता-बागडोगरासाठी फ्लाइटचे तिकीट बुक करु शकता.

2. एअर इंडियाची नवी ओळख

एअर इंडिया एक्सप्रेसने आपली नवीन ब्रॅण्ड ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आपली ब्रॅण्ड ओळख पुन्हा डिजाइन केली आहे. यामध्ये प्रवाशांना त्यांच्या सोयीनुसार फ्लाय अॅज यू आर अंतर्गत डिजिटल पद्धतीने विमान उड्डाण करण्याची सुविधा मिळणार आहे.

3. एअर इंडियाची ऑफर्स काय?

Tata NeuPass कार्यक्रमांतर्गत प्रवाशांना अनेक सेवांचा लाभ यामध्ये दिला जाणार आहे. Tata NeupPass Rewards कार्यक्रमांतर्गत ८ टक्के Neu Coins मिळवण्याची संधी मिळणार आहे. ज्याचा उपयोग इतर डील आणि खाण्यापिण्यासाठी करता येईल. तसेच ज्यांच्याकडे Highflyer आणि Jetsetter बॅज आहेत त्यांना Xpress Ahead च्या अंतर्गत मोफत प्राधान्य सेवा मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bullet Train प्रकल्पाचे काम सुस्साट, BKC स्टेशनचे काम ८० टक्के पूर्ण; NHSRCLची मोठी माहिती

Pune Crime : पंढरीला जाताना वारकऱ्यांना लुटलं, मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपींना पकडतानाचा थराराक CCTV

Pune Tourism : रिमझिम पाऊस अन् पांढराशुभ्र धबधबा, पुण्यात लपलंय अद्भुत सौंदर्य

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

SCROLL FOR NEXT