Ahmednagar Tourism Saam Tv
लाईफस्टाईल

Ahmednagar Tourism: सुट्टीत मित्रांसोबत कल्ला करायचाय? अहमदनगरची करा सफर, अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

Siddhi Hande

रोजच्या या गडबडीच्या जीवनातून सर्वांनाच सुट्टी हवी असते. सर्वच आपल्या सुट्टीचे प्लान करत असतात. आपली ही वीकेंड ट्रिप कुठे एन्जॅाय करायची, असा प्रश्न सगळ्यानांच पडत असतो. म्हणून ही वीकेंडची सुट्टी तुम्ही अहमदनगर शहरात एन्जॉय करु शकतात.

महाराष्ट्रातील अहमदनगर छत्रपती संभाजी नगर ११४ किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. अहमदनगर शहराला भेट देण्यासाठी अनेक नैसर्गिक आणि ऐतिहासिक पर्यटन स्थळे आहेत. हे शहर त्याच्या सुंदर आकर्षणांमुळे सर्वच पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असते. ज्या पर्यटकांना अहमदनगरच्या ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायची असेल त्यांच्यासाठी अहमदनगर शहर हे एक उत्तम ठिकाण आहे. सौंदर्याने नटलेलं हे शहर पर्यटक आणि करिअर प्रेमी असणाऱ्या दोघांचे आहे. या शहरात तुम्हाला एक्सप्लोर करायला खूप काही ठिकाणे मिळतील. तुम्हीही आताच्या सुट्टीला अहमदनगर शहराला भेट देण्यासाठी जात असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी फार उपयोगी ठरेल. तुमचा हा अहमदनगर शहराचा प्रवास खूप अविस्मरणीय ठरणार आहे.

अहमदनगर मधील प्रेक्षणीय स्थळे

अहमदनगर किल्ला

अहमदनगर शहरातील हा किल्ला सर्वात आकर्षक पर्यटन स्थळांपैकी आहे. हा किल्ला १४९० मध्ये अहमद निजामशहाने बांधला होता. या किल्याला भेट दोण्यासाठी ३० मीटर रुंदीचा खड्डा ओलांडून एका पुलांवरुन जाता येते. अहमदनगरतील हा किल्ला वर्तुळाकार आहे. हा किल्ला १८ मीटर उंच असून त्याला आधार देणारे दोन बुरुज आहेत. या किल्यात अनेक पराक्रमे झाली आहेत. ऐतिहासिक वारसा असलेल्या या किल्याची किर्ती खूप महान आहे. या किल्याचा वापर भारत छोडो आंदलोनासाठी केला होता.

सलाबत खान -२ ची समाधी

सलाबत खान यांची द्वितीय समाधी चांदी बीबी पॅलेस या नावाने ओळखली जाते. या दरबारात सलाबत खान मुर्तझाचा दुसरा मंत्री होता. ही भव्य समाधी दगडाने बांधलेली आहे. या समाधीचे स्मारक समुद्रसपाटीपासून ३०८० फूट उंचीवर आहे. हे स्मारक फक्त तीन मजली आहे. या समाधीचे संपूर्ण दृश्य शहराच्या कोणत्याही भागातून पाहायला मिळते.

मेहेराबाद

मेहेराबाद या आश्रमाची स्थापना १९२३ साली अरणगावात अनुयांचा निवारासाठी झाली होती. जिवंत असतानाच मेहेरे बाबा यांनी समाधीचे रुपांतर तीर्थक्षेत्रात करण्याचे ठरविले होते. मेहेराबाद हे पर्यटन स्थळ अहमदनगर शहरापासून ९ किलोमीटर अंतरावर आहे. त्यांच्या निधनानंतर दरवर्षी मोठ्या संख्येने लाखो पर्यटक येत असतात. सर्व पर्यटक संपूर्ण भारतातून श्रध्दाजंली अर्पण करण्यासाठी या तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी जात असतात.

कॅव्हलरी टँक म्युझियम

कॅव्हलरी टँक म्युझियम आशियातील एक अनोखे संग्रहालय आहे. हे संग्रहालय ऑर्मर्ड कॅाप्स सेंटर या स्कूलने १९९४ मध्ये स्थापन केले होते. या संग्रहालयात भारत-पाकिस्तानच्या युध्दापासून ते पहिल्या महायुध्दाच्या काळापर्यंतची विविध वाहने आणि लढाऊ रणगाडे प्रदर्शित केली जातात. या म्युझियमध्ये रोल्स रॅायस सिलव्हर घोस्ट यांच्या कारचे ही प्रदर्शन पाहायला मिळेल.

रेहेकुरी काळवीट अभयारण्य

रेहेकुरी काळवीट अभयारण्य कर्जत तालुक्यात आहे. हे अभयारण्य भारतीय रेहेकुरी काळवीट प्राण्यांसाठी प्रसिध्द आहे. या अभयारण्याची चौरस २.१७ किलोमीटर क्षेत्रात पसरलेली आहे. रेहेकुरी काळवीट हे अभयारण्य महाराष्ट्रातील पर्यटकांना पाहण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. हे अभयारण्य अहमदनगरपासून ८० किलोमीटर अंतरावर आहे. महाराष्ट्रात काळ्या हरणाला 'कालावित' म्हणून सहज ओळखता येते

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: लोकसभेत फटका, विधानसभेत सावध पवित्रा! भाजपने विधानसभेसाठी काय केली आहे मायक्रो प्लॅनिंग? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates : भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटलांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल

Curry Leaves: रिकाम्या पोटी कढीपत्त्याची पानं खाण्याचे आरोग्यदायी फायदे...

Health Tips: पोट साफ होण्यासाठी आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा...

Popular Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, दोन वेळा जिंकला होता ऑस्कर अवॉर्ड

SCROLL FOR NEXT