Local Train Traveling Tips: लहान मुलांसह मुंबई लोकलमध्ये प्रवास करण्याची योग्य वेळ कोणती? वाचा सविस्तर

Traveling With Children in Mumbai Local Train: आम्ही गृहिणी तसेच लहान मुलं आणि ट्रेनने प्रवास करण्याची माहिती नसलेल्यांनी कोणत्या वेळेत प्रवास करावा याची माहिती दिली आहे.
Traveling With Children in Mumbai Local Train
Local Train Traveling TipsSaam TV
Published On

Best Time to Travel in Mumbai Local Train: मुंबईची लाइफ्लाईन म्हणजे लोकल ट्रेन. दररोज लाखोंच्या संख्येने प्रवाशी ट्रेनने प्रवास करतात. तुम्ही देखील मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करत असाल. सकाळी कामाच्या वेळेत ट्रेनमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी असते. या गर्दीतून प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. अशात काही व्यक्ती आपल्या लहान मुलांसह ट्रेनमध्ये येतात. त्यामुळे यात लहान मुलांचे आणि मोठ्या व्यक्तींचे देखील खूप हाल होतात.

Traveling With Children in Mumbai Local Train
Pregnancy Travel Tips : प्रेग्नन्सीत फिरण्याचा आनंद घ्यायचाय? 'या' टिप्स फॉलो करून होईल सुरक्षित प्रवास

मुंबई लोकलमध्ये गर्दीच्या वेळेत आल्यावर काही महिला आणि लहान मुलांना दुखापत सुद्धा होते. यामुळे ट्रेनमध्ये बऱ्याचदा भांडणे सुद्धा होतात. तुमच्या घरी देखील लहान मुलं असतील किंवा तुम्ही गृहिणी असाल आणि ट्रेनमधून प्रवास कसा करावा हे तुम्हाला समजत नसेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. यामध्ये आम्ही गृहिणी तसेच लहान मुलं आणि ट्रेनने प्रवास करण्याची माहिती नसलेल्यांनी कोणत्या वेळेत प्रवास करावा याची माहिती दिली आहे.

लहान मुलांसह कोणत्या वेळेत प्रवास करावा?

रविवारी

जर तुम्ही लहान मुलांना घेऊन मुंबई लोकलने प्रवास करणार असाल तर रविवारी घराबाहेर पडा. रविवारी सर्वांना सुट्टी असल्याने ट्रेनला गर्दी कमी असते. मात्र रविवारी मेगा ब्लॉकच्या वेळा आधी तपासा.

सुट्टीच्या दिवशी

सण समारंभ साजरे करण्यासाठी तुम्हाला नातेवाईकांच्या घरी जायचे असेल तर त्या दिवशी सुट्टी आहे की नाही हे आधी तपासून घ्या. सुट्टी असेल तरच घराबाहेर पडा.

दुपारच्या वेळेत

जर तुम्हाला सुट्टीच्या दिवशी प्रवास करणे शक्य नसेल तर अशावेळी दुपारच्या वेळेत प्रवास करा. दुपारी 12.30 ते 4.00 या वेळेत प्रवास करा. सकाळी 6 ते 12 आणि संध्याकाळी 4.30 ते 9 यावेळेत मुंबई लोकल ट्रेन गर्दीने भरलेल्या असतात. हा वेळ ऑफिसला जाणाऱ्या व्यक्तींचा आहे. त्यामुळे यावेळेत प्रवास करू नका.

Traveling With Children in Mumbai Local Train
Travel Tips: बाहेर पडण्यापूर्वी महिलांनी 'या' गोष्टी पर्समध्ये ठेवा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com