Relationship With In Laws marriage saam tv
लाईफस्टाईल

Relationship With In Laws: लग्नानंतर मुली सासरचं घर आपलं मानतात, पण मुलं असं का करू शकत नाही?

Relationship With In Laws : लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक मोठा टप्पा असतो. लग्नानंतर मुलांना त्याच्या सासू-सासऱ्यांचं घर आपलं म्हणायला काहीशा अडचणी येतात.

Surabhi Jayashree Jagdish

लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील एक मोठा टप्पा असतो. असं म्हणतात लग्न हे केवळ दोन व्यक्तींचं होत नाही तर ते दोन कुटुंबांचं होतं. सामान्यपणे हिंदू धर्मामध्ये मुलगी लग्न करून मुलाच्या घरी जाते. यावेळी ती मुलाच्या घराला स्वतःच घर समजते आणि त्यानुसार वागू लागते.

मात्र असं अनेकदा दिसून येतं की, मुली त्यांचं सासरचं घर आपलं मानतात. मात्र मुलं असं करताना दिसत नाही. मुलांना त्याच्या सासू-सासऱ्यांचं घर आपलं म्हणायला काहीशा अडचणी येतात. परंतु हे असं का घडतं, हे जाणून घेऊया.

संस्कार आणि परंपरा

भारतीय समाजात सासरच्या घरी गेल्यावर मुलींना ते स्वीकारून त्याच्या वेगळ्या भूमिका स्वीकाराव्या लागतात. यावेळी सासरचे संस्कार आणि परंपरा पाळल्या पाहिजेत हे त्यांना लहानपणापासूनच शिकवलं जातं. याउलट मुलांना आईवडिलांच्या घरी राहण्याची सवय असते. त्यामुळे त्यांना अशी शिकवण दिली जात नाही. त्यामुळे मुलांमद्ये असा बदल होणं काहीसं आव्हानात्मक असतं.

इमोशनल कनेक्शन

लग्नानंतर आपलं घरं सोडून जाणं हा प्रत्येक मुलीसाठी एक इमोशनल निर्णय असतो. अशावेळी मुली अनेकदा आपल्या पतीच्या कुटुंबामध्ये रूळतात. त्यानंतर त्या हळूहळू सासरचं घर आपलं मानू लागतात. तर दुसरीकडे मुलं सासरच्या लोकांशी इमोशनल संबंध निर्माण करू शकत नाही.

अपेक्षा

भारतीय समाजात मुलांकडून काहीशा अपेक्षा असतात. यावेळी मुलांवर कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आणि पालकांची काळजी घेण्यासाठी दबाव असतो. कदाचित या कारणामुळे मुलं पत्नीच्या कुटुंबापासून दूर राहतात. याउलट मुलींनी आपल्या कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात असंही त्यांचं मत असतं.

घरातील वेळ

लग्नानंतर मुली नवऱ्याच्या घरी राहतात. त्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य सासरच्या व्यतीत होतं. अशा परिस्थितीत नववधूला मुलाचं घर हे आपलं घर मानण्याशिवाय पर्याय नसतो. याउलट मुलं सासरच्या घरी फार कमी वेळ जातात किंवा त्या ठिकाणी वेळ घालवतात. त्यामुळे अशा वेळी मुलं पत्नीच्या घराला जास्त आपलंसं समजत नाहीत.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : मंगळवार शुभ ठरणार की आव्हानात्मक? आजच वाचा राशीभविष्य

Toilet Scrolling : टॉयलेटमध्ये फोन वापरताय? गंभीर आजाराचा करावा लागेल सामना, अभ्यासात मोठा खुलासा

Nangartas Waterfall : शहराच्या गजबजाटापासून दूर वसलाय नांगरतास धबधबा, पाहता क्षणी ताणतणावातून व्हाल Relax

Maharashtra Live News Update: नजर ठेवण्यासाठी पोलीसांकडून अत्याधूनिक ड्रोनचा वापर

Eye Care: डोळ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहेत 'हे' व्हिटामिन, ९९% लोकांना माहिती नसेल

SCROLL FOR NEXT