Shukra Vakri 2023  Saam tv
लाईफस्टाईल

Shukra Vakri 2023 : अधिक मासात शुक्र ग्रह होणार वक्री ! या राशींवर येणार मोठ संकट, अचानक धनलाभाची शक्यता

Shukra In Kundali : शुक्र हा भौतिक सुख, संपत्ती, विलास, प्रेम, प्रणय, सौंदर्य, आकर्षण यांच्याशी संबंधित आहे.

कोमल दामुद्रे

Vakri Shukra 2023 in Kark : हिंदू पंचागानुसार अधिक मास सुरु झाला आहे. यामध्ये अनेक राशींना चांगले वाईट परिणाम भोगावे लागतील. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा विशिष्ट कालावधीनंतर संक्रमण करत असतो किंवा वक्री होत असतो. अशातच शुक्र ग्रह वक्री होणार आहे.

शुक्र हा भौतिक सुख, संपत्ती, विलास, प्रेम, प्रणय, सौंदर्य, आकर्षण यांच्याशी संबंधित आहे. जेव्हा जेव्हा शुक्र त्याचे राशिचक्र बदलतो किंवा फिरतो तेव्हा त्याचा परिणाम लोकांच्या जीवनातील या सर्व क्षेत्रांवर होतो. २३ जुलै रोजी शुक्र आपल्या प्रतिगामी अवस्थेत सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या प्रतिगामी गतीचा सर्व राशींच्या लोकांवर मोठा प्रभाव पडेल आणि 4 राशीच्या लोकांसाठी ते विशेषतः शुभ राहील तर काही वेळेस अडचणीचा सामना करावा लागेल. जाणून घेऊया त्याबद्दल सविस्तर

1. वृषभ -

वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि शुक्राची प्रतिगामी गती या राशीच्या लोकांना खूप लाभ देईल. मनासारखी नोकरी (Job) मिळेल व पगारही (Salary) वाढेल परंतु, त्याआधी आर्थिक संकटांचा सामना करावा लागेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. कपल्सचे नाते अधिक घट्ट होईल. कर्जातून मुक्ती होईल

2. सिंह -

हा शुक्र सिंह राशीच्या लोकांना करिअरच्या दृष्टीने अधिक लाभ देणार आहे. आवडत्या क्षेत्रात यश मिळवाल. वरिष्ठांकडून आवश्यक सहकार्य मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अविवाहित लोकांचे विवाह (Marriage) लवकरच होतील.

3. कन्या

शुक्राच्या प्रतिगामी हालचालीमुळे कन्या राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होईल. भाग्य तुमच्या सोबत राहील. पुढे जाण्याच्या नवीन संधी मिळतील. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या वेळी पद, पैसा, प्रतिष्ठा, सुख सर्वकाही देईल असे म्हणता येईल.

4. मकर

शुक्र प्रतिगामी मकर राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देईल. करिअरमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. व्यवसायात लाभ होईल. नवीन काम सुरू करू शकाल. वैवाहिक जीवन, प्रेम जीवनात आनंद राहील. जोडीदाराची साथ चांगली राहील.

टीप : येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bollywood Movies 2026: 'बॅटल ऑफ गलवान' ते 'धुरंधर २'; २०२६मध्ये प्रदर्शित होणार बॉलिवूडचे हे मोठे चित्रपट

Kasba Ganpati : भाविकांसाठी आनंदवार्ता! पुण्यातील प्रसिद्ध मंदिर दर्शनासाठी खुले; वाचा सविस्तर

BMC Election 2026: अखेरच्या क्षणी वंचितकडून काँग्रेसला दणका, १६ वॉर्डमध्ये उमेदवारच नाही; इच्छुकांचा संताप

Heart attack: भारतातील जवळपास 90 टक्के हार्ट अटॅकमागे लपलीयेत ही ४ कारणं; वेळीच धोका ओळखून करा उपाय

Corporation Election: संभाजीनगरमध्ये रंगला महायुतीचा आखाडा; युतीतील बिघाडी उद्धव ठाकरेंच्या पथ्यावर?

SCROLL FOR NEXT