Bollywood Movies 2026: 'बॅटल ऑफ गलवान' ते 'धुरंधर २'; २०२६मध्ये प्रदर्शित होणार बॉलिवूडचे हे मोठे चित्रपट

Bollywood Movies 2026: येणारे वर्ष मनोरंजन जगतासाठी खरोखरच शानदार असणार आहे. २०२६ हे वर्ष प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे एक संपूर्ण पॅकेज घेऊन येते.
Bollywood Movies 2026
Bollywood Movies 2026Saam Tv
Published On

Bollywood Movies 2026: आगामी २०२६ हे वर्ष बॉलीवूडसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण या वर्षात अनेक बिग बजेट आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विशेष म्हणजे ईद 2026च्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर पाहायला मिळणार असून ‘धुरंधर 2’सह इतर मोठे चित्रपट एकमेकांसमोर उभे राहणार आहेत.

रणवीर सिंगचा ‘धुरंधर 2’ हा चित्रपट 2026 मधील सर्वात चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. पहिल्या भागाच्या यशानंतर या सीक्वलकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट फक्त हिंदीतच नाही, तर पॅन इंडिया स्तरावर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. ईदच्या सणाला प्रदर्शित होणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Bollywood Movies 2026
Famous Actor mother Dies: प्रसिद्ध अभिनेत्याला मातृशोक; संथाकुमारी यांचे दिर्घकालीन आजाराने निधन

मात्र, ‘धुरंधर 2’ एकटाच नाही. याच काळात प्रदर्शित होणाऱ्या इतर मोठ्या चित्रपटांमुळे बॉक्स ऑफिसवर चुरस वाढणार आहे. यश स्टारर ‘टॉक्सिक: अ फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ हाही ईद 2026 च्या आसपास रिलीज होण्याची शक्यता असून, हा चित्रपट थेट ‘धुरंधर 2’ ला टक्कर देऊ शकतो.

Bollywood Movies 2026
Don 3: रणवीर सिंहच्या एक्झिटनंतर 'या' अभिनेत्याचं नशीब उजळणार; फरहान अख्तरच्या 'डॉन ३'मध्ये करणार धमाकेदार एन्ट्री?

याशिवाय, 2026 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या इतर महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये ‘रामायण पार्ट 1’, ‘अल्फा’, ‘मर्दानी 3’, ‘पती पत्नी और वो 2’ आणि ‘बॅटल ऑफ गलवान’ यांचा समावेश आहे. ‘बॅटल ऑफ गलवान’मध्ये सलमान खान प्रमुख भूमिकेत झळकणार असून, हा चित्रपट देशभक्ती आणि युद्धावर आधारित असल्याने प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता आहे.

‘रामायण पार्ट 1’ हा चित्रपट भव्य सेट्स, मोठा स्टारकास्ट आणि उच्च दर्जाच्या व्हीएफएक्समुळे चर्चेत आहे. तर ‘मर्दानी 3’मधून राणी मुखर्जी पुन्हा एकदा दमदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘अल्फा’ हा स्पाय-थ्रिलर प्रकारातील चित्रपट असून, नव्या पिढीच्या प्रेक्षकांना आकर्षित करेल. एकूणच, 2026 मध्ये बॉलीवूडमध्ये मोठ्या स्टार्स, मोठे दिग्दर्शक आणि भव्य कथा यांचा संगम पाहायला मिळणार आहे. विशेषतः ईद 2026 च्या बॉक्स ऑफिस क्लेक्शनकडे संपूर्ण इंडस्ट्रीचं लक्ष लागले असून, कोणता चित्रपट बाजी मारतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com