quinoa benefits for weight loss and cholesterol control Freepik
लाईफस्टाईल

cholesterol control : कोलेस्ट्रोल राहिल नियंत्रित आणि वजन होईल झटाझट कमी, डाएटमध्ये करा या एका धान्याचा समावेश

Best Superfoods to Reduce Cholesterol Naturally : कोलेस्ट्रोल नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि वजन झपाट्याने कमी करण्यासाठी क्विओना या सुपर धान्याचा आपल्या डायटमध्ये जरूर समावेश करा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सर्वचजण एक आरोग्यदायी आणि फिट लाईफ जगण्यासाठी धडपड करत असतात. काहीजण जीमला जातात, डायटिंग करतात, योगा आणि ध्यानधारणा करतात. पण आपल्या शरिराचे संपूर्ण आरोग्य मुख्यतः आपण काय खातो किंवा कोणता आहार घेतो यावर अवलंबून असते. क्विनोआ हे एक असे धान्य आहे ज्याचा समावेश तुम्ही तुमच्या डायटमध्ये नक्की करायलाच हवा. यामध्ये भरपूर प्रमाणात असलेले फायबर शरिरात अतिरिक्त कोलेस्ट्रोल शोषण्यापासून थांबवते. यामुळे वजन झटाझट कमी होण्यास मदत होते.

क्विनोआ धान्यांप्रमाणेच पौष्टिक गुणधर्माचे असते पण ते फुलांच्या रोपाचे बीज आहे. ज्यामुळे ते स्यूडो-ग्रेन म्हणून देखील ओळखले जाते. क्विनोआचे नियमित सेवन केल्याने शरिरातील एकूण कोलेस्ट्रोल आणि ट्रायग्लिसराईड्स नियंत्रित राहते. ट्रायग्लिसराईड्स शरिरातील अकिरिक्त चरबीचे रूपांतर आवश्यक ऊर्जेमध्ये करते. पण रक्तातील त्याचे प्रमाण गरजेरपेक्षा जास्त वाढल्यास हृदयरोगाच्या समस्या उद्धवू शकतात.

यामध्ये लवकर विरघळणारे फायबर असतात जे पचन संस्था सुधारतात. अनावश्यक आणि खराब कोलेस्ट्रोल कमी करतात. क्विनोआमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतात आणि हृदयाचे आरोग्यही सुरक्षित करतात. यामध्ये आढळणारे बायोअॅक्टिव्ह घटक जसे की, पॉलीपेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स शरिरातील लिपीडची पातळी नियंत्रित ठेवतात. यामुळे होणारी जळजळ कमी करण्यास मदत होते.

क्विनोआमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या फायबरमुळे पोट जास्तकाळ भरलेले राहते. यामुळे अनावश्यक भूक लागत नाही. वजन कमी करण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या आहारात पांढरा भात, पास्ता किंवा ब्रेडऐवजी क्विनोआचे सेवन करू शकता. शिवाय सूप, सॅलेड आणि इतर पदार्थांमध्येही क्विनोआचा वापर करू शकता. यामुळे त्याचे पौष्टिक मुल्य आणि फायबरचे प्रमाण वाढते. तुमच्या सकाळच्या नाश्त्यात क्विनोआचा समावेश केल्यास अधिक फायदेशीर ठरते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hyperloop Rail: देशातील पहिली हायपरलूप रेल्वे कधी धावणार? जाणून घ्या, नव्या रेल्वेचा मार्ग

Ration Card Holder: राज्यातील 3 हजार रेशन कार्डधारकांना नाही मिळणार रेशन; काय आहे कारण?

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं; मनोज जरांगे समर्थकांकडून बीड जिल्हा बंदची हाक, VIDEO

EPFO 3.0 लाँन्च होण्यास का होतोय विलंब? कोणत्या पाच नियमात होतील बदल? जाणून संपूर्ण माहिती

Horrific : दुहेरी हत्याकांडाने खळबळ; घरगुती वादातून जावयाने केली मायलेकीची हत्या

SCROLL FOR NEXT