चेहऱ्यावरील पांढऱ्या पुरळांसाठी करा हे सोपे उपाय
चेहऱ्यावरील पांढऱ्या पुरळांसाठी करा हे सोपे उपाय  saam tv
लाईफस्टाईल

चेहऱ्यावरील पांढऱ्या पुरळांसाठी करा हे सोपे उपाय

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्याबरोबरच त्वचेचीही विशेष काळजी घेणे फार महत्वाचे आहे. थोडीसा निष्काळजीपणा आपल्याला त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना आमंत्रण देऊ शकते. बहुतेक लोकांना त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यातील एक समस्या म्हणजे त्वचेवरील पांढऱ्या डागांची समस्या. याला मिलिया म्हणून देखील ओळखले जाते. अशा प्रकारच्या पुरळ डोळ्याखाली, कपाळ, नाक, गालांवर येतात. कधीकधी या लाल रंगाच्यादेखील असतात आणि नंतर पिवळ्या दिसू लागतात. ज्यामध्ये वेदना होत नाही परंतु त्यामुळे आपल्या चेहऱ्याची सुंदरता कमी होते. (Here's an easy way to get rid of acne on your face)

अशा प्रकारच्या पांढऱ्या पुरळ कोणत्याही वयात येऊ शकतात. सहसा अशा पुरळ फारच लहान असतात. जेव्हा त्वचेतील मृत पेशी त्वचेवर येतात तेव्हा त्या अशा पुरळांमध्ये रुपांतरित होतात. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, महाग उत्पादनांऐवजी काही घरगुती उपचारांचा अवलंब केल्यास तुम्हालाही याचा फायदा होऊ शकतो.

कोरफड

कोरफडमध्ये अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म कोरफडमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे आपल्याला त्वचेशी संबंधित प्रत्येक समस्यांपासून मुक्तता मिळू शकते. या पुरळांच्या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी रात्री झोपायच्या आधी कोरफड जेल घ्या आणि त्वचेवरील पांढऱ्या पुरळांवर लावा. किमान एक महिना दररोज हा उपाय केल्यास तुम्हाला नक्की याचा परिणाम दिसुन येईल.

चंदन

चंदन तेलामध्ये सेस्क्वेटरपेन अल्कोहोल आढळतात, ज्यामुळे केवळ चेहऱ्यावर चमकच येत नाही तर त्वचेतील पेशींना ऑक्सिजनही मिळते आणि पांढऱ्या पुरळांपासूनही मुक्ती मिळते. त्वचेवरील पांढऱ्या पुरळ घालवण्यासाठी पांढऱ्या पुरळांवर चंदन तेल लावा आणि नैसर्गिकरित्या कोरडे होऊ द्या. यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. चंदनाची पेस्ट वापरल्यास तेलकट त्वचेपासूनही मुक्तता मिळते.

मध

चेहऱ्यावर पांढरे पुरळ काढून टाकण्यासाठी मध खूप प्रभावी ठरते. त्यात एक प्रकारचा नैसर्गिक मीठ आढळतो. जे तुमची त्वचा निरोगी ठेवते आणि तेलकट त्वचेपासून मुक्त होते. याशिवाय, ते चेहऱ्यावरील पोर्सदेखील खुली होतात. चेहऱ्यावर मध लावण्यासाठी हातावर थोडेसे मध घ्या आणि ते हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावा. थोजावेळ मालिश केल्यानंतर सुमारे 1 तासाने चेहरा धुवा. तुमच्या इच्छेनुसार, या मधात ओट्स आणि साखर मिसळून स्क्रबदेखील बनवू शकता.

डाळिंबाच्या सालीची पूड

डाळिंबाच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात. जे पांढऱ्या पुरळ कमी करण्यासाठी मदत करतात. डाळिंबाची साल पॅनवर तपकिरी होईस्तोवर भाजून घ्या. नंतर त्याची मिक्सरमधुन बारीक करून पावडर बनवा. आता या पावडरमध्ये लिंबू किंवा गुलाबजल मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. कोरडे झाल्यानंतर पाण्याने धुवा.

Edited By- Anuradha

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar आणि Thackeray यांना पाहण्यासाठी इचलकरंजीकर धडपडले,नेमकं काय घडलं?

Sudhir Mungantiwar: शिवरायांची वाघनखं आणण्यास विलंब का होतोय?, सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं कारण

Uddhav Thackaeray: भाजपने केलेल्या पाडापाडीचा सूड घेणार; इचलकरंजीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Lok Sabha Election 2024 : टीएमसीपेक्षा भाजपलाच मतदान करा; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

Today's Marathi News Live : ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर उद्या भररणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT