Grah Gochar  Yandex
लाईफस्टाईल

Grah Gochar : ऐकलं का! 'या' तीन राशींच्या लोकांचे ८ते ९ दिवसात येतील अच्छे दिन; दूर होतील सर्व अडचणी

Grah Gochar : फेब्रुवारी महिना हा ग्रह राशी बदलांच्या दृष्टीकोनातून खूप खास असणार आहे. या महिन्यात सूर्य, बुध, शुक्र आणि मंगळासह चार मोठे ग्रह आपला मार्ग बदलणार आहेत. सिंह राशीसह ३ राशींसाठी फेब्रुवारी महिना अतिशय शुभ असणार आहे. चला तर जाणून घेऊया भाग्यशाली राशींबद्दल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Grah Gochar February 2024 :

फेब्रुवारी महिन्यात सूर्य, मंगळ आणि बुध मकर राशीत एकत्र येतील. त्यामुळे बुधादित्य राजयोग आणि आदित्य मंगल योग तयार होईल. ज्याचा मेष ते मीन पर्यंत १२ राशींवर शुभ आणि अशुभ प्रभाव पडेल. परंतु सिंह राशीसह ३ राशींसाठी फेब्रुवारी महिना अतिशय शुभ असणार आहे. हिंदू पंचांगानुसार १ फेब्रुवारी २०२४ रोजी बुध मकर राशीत संक्रमण करतील. मंगळ ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मकर राशीत प्रवेश करेल. धनाचा दाता शुक्र १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मकर राशीत प्रवेश करेल. यानंतर १३ फेब्रुवारी २०२४ रोजी सूर्यदेव कुंभ राशीत निवास करतील. (Latest News)

सिंह : या राशीसाठी हा काळ चांगला असेल. या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. जीवनात नवीन सकारात्मक बदल घडतील. संयम राहील. दीर्घकाळ चाललेल्या समस्यांपासून सुटका होईल. लव्ह लाईफमध्ये नवीन सरप्राईज मिळतील. ऊर्जा आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. प्रेम जीवनातील रोमँटिक क्षणांचा आनंद घ्याल. तसेच या काळात अनेकांना प्रगतीच्या सुवर्णसंधी उपलब्ध होतील.

कन्या : या राशीतील लोकांसाठीही हा काळा चांगला असेल. या राशीतील काही लोकांच्या करिअरमध्ये नवीन यश मिळेल. परंतु संयम मात्र कमी होईल. याच काळात या राशीतील लोकांच्या कामातील अडथळे लवकरच दूर होतील. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. निराशा दूर होईल. मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल. व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या सुवर्ण संधी मिळतील.

तूळ : तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असेल. या राशीतील लोकांच्या जीवनात महत्त्वाचे बदल होतील. मित्रांच्या मदतीने कामातील अडथळे दूर होतील. जोडीदारासोबतचे नाते घट्ट होईल. तसेच वैवाहिक जोडप्यांसाठी हा काळा चांगला असेल त्यांच्या नात्यात प्रेम आणि प्रणय वाढेल. परंतु तुमच्या जोडीदाराला दुख देतील अशा गोष्टींची चर्चा करू नका. नाहीतर नात्यात कलह वाढू शकतो. अनेकांच्या महत्वाकांक्षा वाढतील. परंतु या काळात आपल्या स्वभावात नम्रता ठेवा.

टीप- ही माहिती फक्त मान्यतेवर आधारित असून आपल्या माहितीसाठी देण्यात आलीय. यासर्व गोष्टींशी साम टीव्ही सहमत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मथुरेत पावसाचा हाहाकार, यमुना नदीचे पाणी घरात शिरलं

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT